घरCORONA UPDATEखुशखबर! एसटीने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही

खुशखबर! एसटीने कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना ई-पासची गरज नाही

Subscribe

कोरोना पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी रेल्वेची आणि एसटी विशेष सोय अद्याप सुरु झालेली नव्हती. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लाखो गणेशभक्तां प्रतिक्षा लागली होती. मात्र ही प्रतिक्षा आता संपली आहे. मंगळवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोकणात जाणार्‍यांसाठी ३ हजार एसटी बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. तसेच एसटी बसने प्रवास करणार्‍यांना कोणत्याही ई-पासची आवश्यकता नसणार आहे.

दरवर्षी कोकणात जाणार्‍या गणेश भक्तांनाच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीन अडीच हजार पेक्षा जास्त बसेस सोडण्यात येते. तसेच रेल्वेकडूनही २५० पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाडया चालविण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे राज्यात गेल्या चार महिन्यापासून आंतरजिल्हा प्रवासावर बंदी आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणता जाणार्‍या चाकरमान्या अडचणी निर्माण झालेली होती. शासनाच्या नियमानूसार  खासगी वाहण आणि ई-पास काढून त्यांना जावे लागत आहे. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांनी कोकणात एसटी बसेस सुरु करण्याची मागणी केली होती. यावर परिवहण मंत्र्यांनी आश्वासन सुध्दा दिले होते. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत परिवहण मंत्री अनिल परब यांनी मुंबईतील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी ३ हजार बसेस सोडण्याची घोषणा केली आहे. चाकरमान्यांना १२ ऑगस्टपर्यंत कोकणात जाता येणार आहे. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे क्वारंटाईनचा कालावधी १० दिवस करण्यात आला असून १२ ऑगस्टनंतर कोकणात जाणार्‍यांनी स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक असणार आहे. एसटीने जाणार्‍या चाकरमान्यांना कोणत्याही इ-पासची गरज भासणार नाही. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांनी यंदा नियम पाळून गणेशोत्सव साजरा करावा असे मी आवाहन ही परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

- Advertisement -

आजपासून बुकिंग सुरु

बुधवारपासून या एसटी बसेसचे बुकिंग सुरु होणार आहे. तसेच सोशल डिस्टंसिग पाळण्यासाठी एका बसमध्ये फक्त २२  प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. ग्रुप बुकिंग केलेल्यांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. यंदा एसटी ५०% प्रवासी क्षमतेने चालविण्यात येणार असूनदेखील त्यासाठी कोणतेही अतिरिक्त भाडे आकारण्यात येणार नाही.


हे ही वाचा – राम मंदिर उभं रहावं यासाठी ‘ही’ शबरी गेले २८ वर्ष करतेय उपवास!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -