घरमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास - दिवाकर रावते

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत प्रवास – दिवाकर रावते

Subscribe

राज्यातील ७६ तालुक्यांतील महसुल मंडळांतील ७ लाख ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रवास मिळणार आहे. साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलतीचा फायदा होणार आहे.

राज्यात नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या ७६ तालुक्यांतील महसुल मंडळांतील ७ लाख ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देण्यात येणार आहे. शैक्षणिक वर्षासाठी एसटी महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे. पूर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली आहे आणि आता नव्याने दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतील विद्यार्थ्यांनाही येत्या एक जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना दिलासादायक निर्णय

शेतकरी सध्या पावसाअभावी अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील इतर लोकही दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अडचणीत आले आहेत. शिवाय शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोक हे एसटीचे बहुतांश प्रवासी असल्याने एक प्रकारे ते एसटीचे अन्नदाते आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांना मदत करणे हे एसटीचे कर्तव्य असल्याचे मानून त्यांच्या शाळा, महाविदयालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी मासिक पासासाठी १०० टक्के सवलत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पासासाठी सध्या ६६.६७ टक्के इतकी सवलत देण्यात येते.

- Advertisement -

अतिरिक्त बोजा पडणार

ही सवलत एसटी महामंडळातर्फत देण्यात येत असून, त्यासाठी महामंडळावर साधारण १२३ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. राज्यातील साधारण ३५ लाख विद्यार्थ्यांना या सवलत योजनेचा सध्या लाभ मिळत असून, आता नवीन महसुल मंडळातील अतिरिक्त ७ लाख ३ हजार विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असे ही रावते म्हणाले आहे.


वाचा – एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी मिळणार ६ महिन्यांची रजा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -