घरमहाराष्ट्रईव्हीएममध्ये बिघाड हा निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणाच

ईव्हीएममध्ये बिघाड हा निवडणूक आयोगाचा निष्काळजीपणाच

Subscribe

दरवेळीप्रमाणे यंदाही मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. यावेळी ईव्हीएम बिघाडाच्या 39 तक्रारी समोर आल्या आहेत.

विदर्भात काल झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएम बिघाडाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. या आधीही झालेल्या निवडणुकांमधील मतदानादरम्यानचा अनुभव पाहता निवडणूक आयोगाने योग्य ती कारवाई व काळजी घेईल, अशी आम्हाला अपेक्षा होती. पण आयोगाने अपेक्षित काळजी घेतली नसल्याची खंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली. आता तरी पुढील टप्प्यात होणा-या मतदान प्रक्रियेत असा घोळ होऊ नये, अशी आमची आयोगाकडे मागणी आहे, असेही सावंत म्हणाले.

महाराष्ट्रात सात लोकसभा मतदारसंघात गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या दरम्यान दरवेळीप्रमाणे यंदाही मतदानावेळी अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाला. यावेळी ईव्हीएम बिघाडाच्या 39 तक्रारी समोर आल्या. प्रदेश काँग्रेसच्या वॉर रूमकडून यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

- Advertisement -

मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण व निष्कारण त्रास

नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ अशा जवळपास सर्वच ठिकाणी मतदार यादीत घोळ, ईव्हीएम बिघाड याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. काही काळ गोंधळाचे वातावरण व निष्कारण मतदारांना ऐन गरमीत मतदान केंद्रांबाहेर तात्कळत उभे राहावे लागले. परिणामी मतदारांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनाही बसला फटका

नागपूरच्या धरमपेठ शाळेतील मतदान केंद्रावर सकाळी व्हीव्हीपॅट मशीन बंद असल्याने मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे कुटुंबीयही नियोजित वेळेपेक्षा काही काळ उशिरा मतदान केंद्रावर पोहोचले. नागपूरमधील सेवाग्राम, देवळी गावात तसेच वर्धा मतदार संघात मतदार यादीत घोळ झाल्याने अनेक मतदारांनी तक्रारी केल्या. घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव आहे, तर इतरांचे नाव नाही, ज्येष्ठ नागरिकही एक तास नाव शोधून वैतागले.

गोंदियातील रामनगर मतदान केंद्रातील 276 बुथवर मतदान सुरू होण्याआधी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला. यवतमाळच्या मतदान केंद्रांवर अनेक ठिकाणी 10 ते 15 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले. त्यामुळे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली.

कर्मचा-यांचेही हाल, न खाता-पिता बजावले कर्तव्य

यवतमाळ येथे मतदारांमध्ये उत्साह असताना अनेक केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडणा-या कर्मचाऱ्यांचे मात्र हाल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. प्रत्येक मतदान केंद्रात मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले असताना अनेक केंद्रांत पिण्यासाठी पाणीच नव्हेत. जेवणाचेही अबाळ झाले. काही केंद्रांमध्ये कर्मचा-यांना अन्नपाण्याशिवाय भर उन्हातच बसून काम करावे लागले. मतदान कर्मचारी म्हणून काम करणा-या यंत्रणेसाठी तेथे मंडप टाकण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांना उघड्यावर व झाडाच्या आडोशाने आश्रय घ्यावा लागला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -