घरमहाराष्ट्रपुणे-मुंबई महामार्गावर १५ मिनिटांचा पहिला 'ब्लॉक'

पुणे-मुंबई महामार्गावर १५ मिनिटांचा पहिला ‘ब्लॉक’

Subscribe

पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा बोगद्या जवळ आज पहिला १५ मिनिटांचा ब्लॉक घेण्यात आला आहे.

मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना आता काही दिवसांचा ब्रेक लागणार आहे. आजपासून खंडाळा बोगद्या जवळ मेगाब्लॉक घेण्यात येणार असून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगदा दरम्यान ढिले झालेल्या दरडीचे दगड काढण्याचे काम १२ मार्च ते २० मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून सकाळी दहा वाजता पंधरा मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. यामुळे पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पंधरा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली होती. दिवसभरात पाच टप्प्यात १५-१५ मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

१५-१५ मिनिटांचा मेगाब्लॉक

खंडाळा बोगद्याजवळ दरड काढण्याचे काम करताना पुणे आणि मुंबई लेन वरील वाहतुक दिवसभरातुन ५ वेळा १५ मिनिटाकरिता पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च रोजी दुपारी ०३:१५ वाजल्यापासून १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. याची पुणे-मुंबई मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाश्यानी नोंद घ्यावी.

- Advertisement -

दिवस भरात घेण्यात येणारा ब्लॉक

– ब्लॉक १ :- सकाळी १० ते सकाळी १०:१५
– ब्लॉक २ :- सकाळी ११ ते सकाळी ११:१५
– ब्लॉक ३ :- दुपारी १२ ते दुपारी १२:१५
– ब्लॉक ४ :- दुपारी ०२ ते दुपारी ०२:१५
– ब्लॉक ५ :- दुपारी ०३ ते दुपारी ०३:१५


वाचा – मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर नऊ दिवसांचा ब्लॉक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -