घरमहाराष्ट्रआजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी

आजपासून दुकाने, बाजारपेठाही खुल्या रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक कामांसाठी

Subscribe

मिशन बिगिन अगेन

करोनाच्या संसर्गामुळे गेली दोन महिने बंद असलेली मुंबई शुक्रवारपासून हळुहळु रुळावर येणार आहे. राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गत पहिली अनलॉक प्रक्रिया ३ जूनपासून सुरू होणार होती. मात्र निसर्ग चक्रीवादळामुळे ती दोन दिवस पुढे ढकलण्यात आली. आता ५ जून अर्थात शुक्रवारपासून बाधित क्षेत्र वगळता मुंबईतील दुकाने, बाजारपेठा सुरू होणार आहेत. टॅक्सी आणि रिक्षा सुरू होणार असून त्यांचा वापर अत्यावश्यक कामांसाठी करण्यात येऊ शकतो.

अनलॉक-२ च्या टप्प्यात येत्या ८ जूनपासून मुंबई, पुणे महानगर प्रदेशमध्ये (एमएमआर) प्रवास करण्यासाठी पासाची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे नवी मुंबई, ठाणे, कल्याणमधून मुंबईत कामाला येणार्‍यांचा त्याचा फायदा होणार आहे. १० टक्के कर्मचार्‍यांसह खाजगी कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच ८ जूनपासून नियमित घरोघरी वृत्तपत्रांचे वितरणही होणार आहे. असे जरी असले तरी मुंबईची लाईफ लाईन लोकल सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

राज्य सरकारने ३१ मे रोजी पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पाचवा लॉकडाऊन ३० जूनपर्यंत असला तरी सरकारने मुंबई आणि पुणे महानगर प्रदेश तसेच राज्यात रेड झोनमध्ये राहिलेल्या अनेक महापालिका क्षेत्रात निर्बंध शिथिल केले आहेत. परिणामी येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.सरकारने ३ जूनपासून मिशन बिगिन अगेन सुरू केले होते. मात्र, निसर्ग चक्रीवादळामुळे लोकांना दोन दिवस घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. चक्रीवादळाचे संकट टळल्याने आता शुक्रवारपासून लोकांना बाहेर पडता येणार आहे. पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत लोकांना आपली दिनचर्या करता येईल. या दरम्यान रात्री ९ ते पहाटे ५ अशी संचारबंदी राहणार आहे.

आज पासून

=दुकाने, बाजारपेठाही खुल्या होणार. (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून)
=सम, विषम तारखेला सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकाने सुरू.
=गॅरेज, वर्कशॉप सुरू. टॅक्सी आणि रिक्षा अत्यावश्यक कामांसाठी.
=उद्याने सुरु. जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली करणे शक्य,
व्यायाम करता येणार. मात्र कोणतीही ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी नाही.
=जवळच्या प्रवासास परवानगी. मात्र, लांब प्रवास करण्यास मनाई.
=प्लंबर, इलेक्ट्रीशन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञांना मास्क बंधनकारक.
=कपड्याची दुकाने सुरू पण दुकानात ट्रायल रूमला परवानगी नाही.

- Advertisement -

सोमवार पासून

=एमएमआर मधल्या प्रवाशांना पासची आवश्यकता नाही. त्यामुळे ठाणे, कल्याण, नवी मुंबईतून कामानिमित्ताने मुंबईकडे येणार्‍या प्रवाशांना त्याचा फायदा होणार.
=सर्व खासगी कंपन्यांना १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, तेवढ्या क्षमतेमध्ये काम करता येणार. इतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम पद्धतीने घरून काम करतील.
=७ जूनपासून वर्तमानपत्रांची छपाई आणि वितरणाला परवानगी देण्यात आली आहे. वितरण करणार्‍या व्यक्तींनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक.
=शिक्षण क्षेत्राशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, शाळा-कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक यांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कार्यालयीन कामकाजासाठीज काम करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -