घरमहाराष्ट्रखा. पुनम महाजन विरोधात गुन्हा दाखल

खा. पुनम महाजन विरोधात गुन्हा दाखल

Subscribe

लाखोंचा चेक बाउंस झाल्यामुळे खा. पुनम महाजन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनादेश न वटल्याने व्यावसायिक परविंदर सिंग यांनी तक्रार केली आहे.

खासदार पुनम महाजन यांच्या होंडा सीटीच्या आद्या मोटर कंपनी प्रा. लि.कडून होंडा सिटी खरेदीच्या प्रकरणात दिलेले धनादेश न वटल्याने व्यावसायिक परविंदर सिंग यांनी तक्रार केली आहे. परविंदर सिंग यांनी पुनम महाजन, त्यांचे पती वजेंदला राव, मुंबईतील मिलिंद सुर्वे आणि आद्या मोटर कंपनी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. तिघेही आद्या मोटर कंपनीचे संचालक आहेत. परविंदर सिंग हे असेट ऑटो प्रा. लि. चे मालक आहेत. त्यांचे कार्यालय पुण्यात आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१५ मध्ये त्यांना कॅब सर्विस सुरु करायची असल्याने कार खरेदी करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी मुंबईतील आद्या मोटर कंपनीशी संपर्क साधला.

लाखोंचा चेक झाला बाऊंस

यासंदर्भात ते संचालकांना भेटले. त्यांना ११ होंडा सिटी खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली. त्यावेळी त्यांनी संचालकांच्या विनंतीवरून ६८ लाख ७५ हजार रुपये दिले . त्यात ६. २५ लाख रोख तर ६२.५० लाख बँकेतून ट्रान्सफर केले . त्यानंतर सिंग यांना रितसर ११ पावत्याही देण्यात आल्या . तसेच कन्फर्मेशन लेटरही देण्यात आले. त्यात ऑर्डर रद्द केल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही . तसेच सिंग यांना सर्व रक्कम त्यांनी मागितल्यास देण्याचे नमूद केले होते.याप्रकऱणी पुणे सत्र न्यायालयात सिंग यांनी तीन खटले दाखल केले आहेत. तसेच दोन खटल्यांमध्ये तिनही संचालकांना समन्स पाठविले आहेत. त्यांनी दोन प्रकरणांत पुनर्विचार करण्यासंदर्भात अर्ज दिला आहे. तसेच महाजन यांनी चेक बाऊन्स होण्याआधीच कंपनीच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांचा काही संबंध नाही असा युक्तीवाद त्यांच्या वकीलांनी केला आहे. असे सिंग यांचे वकील सिद्धार्थ पाटील यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -