घरCORONA UPDATECorona: धोकादायक! होम क्वारंटाइन व्यक्ती चालवणार शिवभोजन केंद्र

Corona: धोकादायक! होम क्वारंटाइन व्यक्ती चालवणार शिवभोजन केंद्र

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एका होम क्वारंटाइन व्यक्तीला चक्क शिवभोजन केंद्र चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन ठेवण्यात आला असून यामध्ये एकमेकांशी संपर्कात राहणे टाळायचे आहे. मात्र अशातच एका होम क्वारंटाइन व्यक्तीला चक्क शिवभोजन केंद्र चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यामधील ही घटना समोर आली असून ही बाब समजल्यानंतर येथील नगरसेवकाने शिवभोजन केंद्र सील करण्याची मागणी केली आहे. प्रामुख्याने संशयितांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवले जाते. मात्र अशा व्यक्तींनी शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून अनेकांना जेवण दिले जात असताना त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे इतपत योग्य ठरेल, असा सवाल या नगरसेवकाकडून केला जात आहे. दरम्यान, हा व्यक्ती जर कोरोना पॉझिटिव्ह निघाला तर त्याचा प्रादुर्भाव इतरांनाही होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सध्यातरी क्वारंटाइनमध्ये असलेल्यांना असे सर्वसमावेश काम देण्याचे टाळावे, अशी चर्चा केली जात आहे.

हेही वाचा – कोरोनाची लस तयार, नाकातून ड्रॉपद्वारे दिली जाणार

- Advertisement -

काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तीला शिवभोजन केंद्र चालविण्याची परवानगी देण्यात आल्याची धक्कादायक घटना वैभववाडी शहरात उघडकीस आली. दरम्यान ही बाब नगरसेवकांच्या निदर्शनास आल्यानंतर सर्व नगरसेवक आक्रमक झाले. अशा व्यक्तींना ‘शिवभोजन’ थाळी चालवण्याची परवानगी कोणी दिली?, असा सवाल करत तात्काळ केंद्र सील करावे, अशी मागणी या नगरसेवकांनी केली. वैभववाडी तहसीलदारांनी याची दखल घेत हे शिवभोजन केंद्र बंद केले. तसेच या केंद्रावर गेल्या दोन दिवसात १५० जेवणाचा आस्वाद घेतला असून त्यांच्या आरोग्य तपासणी करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -