घरमहाराष्ट्रबाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना त्यांनी कधीच मुख्यमंत्री केले नसते

बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना त्यांनी कधीच मुख्यमंत्री केले नसते

Subscribe

भाजपचे खासदार नारायण राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार

उद्धव ठाकरे हे स्वत: वाघ म्हणवतात; पण हा वाघ पिंजर्‍यातला की पिंजर्‍याबाहेरचा, असा सवाल करत दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केले नसते, अशी जोरदार टीका भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी केली. ४७ शिवसैनिकांच्या भव्य मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाषण केले. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. शेतकर्‍यांचे प्रश्न, कोणत्याही योजना, कोरोनाचं संकट याबाबत काहीही भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावं, कसे बोलावे हे अजून कळत नाही. कोरोनामुळे महाराष्ट्रात ४३ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला.

रविवारी शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्राशी बेईमानी करून हा माणूस मुख्यमंत्री झाला. ५६ जागा मिळाल्या तरीही मुख्यमंत्री झालात. कारण सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. मोदींचे नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी केली. सुशांतप्रकरणी स्वतःच्या मुलाला क्लीन चिट दिली. मात्र, सुशांतने आत्महत्या केलेली नाही. सुशांतचा खूनच झाला आहे. याप्रकरणी एक दिवस आदित्य ठाकरे तुरुंगात जाणार आहे. मला आणि माझ्या मुलांना बेडूक म्हणतो हा माणूस? हा माणूस पुळचट आहे.

- Advertisement -

मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणार्‍या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी मारली आहे का? काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण शिवराळ होती. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे. मुख्यमंत्री म्हणून एक वर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत, असा जोरदार प्रहार नारायण राणे यांनी केला.

राज्य आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जनाची नाही, तर मनाची वाटली पाहिजे. कोणाबद्दल काय बोलावं हे कळत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाला लायक नाही. पंतप्रधानांबद्दल त्यांच्या कामाबद्दल बोलण्याची मुख्यमंत्र्यांची योग्यता नाही. आमच्याकडे नजर फिरवू नका, पळता भुई थोडी होईल. बेडूक एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूंनी फिरतो. मातोश्रीचा इतिहास बाहेर काढेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणजे दिशाभूल करणारे, थापा मारणारे मुख्यमंत्री आहेत. या मुख्यमंत्र्यांना अधिकारीही हसतात. मराठ्यांना आरक्षण हा माणूस कधीही देऊ शकत नाही. कारण मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे, असाही आरोप नारायण राणेंनी केला. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी या माणसाला कधीही मुख्यमंत्री केले नसते. कळसूत्री बाहुली ही किमान तालावर तरी नाचते. उद्धव ठाकरेंना नाचताही येत नाही.आत्तापर्यंतचे सगळे अपयश झाकण्यासाठी कालचे भाषण करण्यात आले, असेही नारायण राणेंनी म्हटले आहे.

मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो, आमच्यासारख्या शिवसैनिकांनी त्यावेळी शिवसेना उभी केली. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, स्वतःला वाघ म्हणवणार्‍या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी मारली आहे का? काल दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेले भाषण शिवराळ होती. एका मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. वाघाची भाषा करणारा हा शेळपट माणूस आहे. मुख्यमंत्री म्हणून एक वर्ष व्हायला आलं. त्यांनी राज्यामध्ये केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला नाही. शेतकरी, शिक्षणाचे प्रश्न, राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल काहीही बोललेले नाहीत, असा जोरदार प्रहार नारायण राणे यांनी केला.

आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील

‘सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही. त्याचा खून करण्यात आला. खुनाचे आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात यांचे एक मंत्री असतील. तो यांचा पुत्र असेल. सुशांतला कशाने मारले? त्यात कोण कोण होते, हे सगळं बाहेर येईल. दिशावरचा बलात्कार, तिला वरून कुणी फेकलं हे काही लपणारं नाही. सीबीआयने अजून केस क्लोज केलेली नाही. उद्धव ठाकरेंनी गैरसमज करून घेऊ नये’, असे नारायण राणे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -