घरट्रेंडिंगकरोना : देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद, 3 हजार ट्रेन ३१ मार्च...

करोना : देशातील प्रवासी रेल्वे वाहतूक बंद, 3 हजार ट्रेन ३१ मार्च पर्यंत बंद राहणार

Subscribe

आजच्या निर्णयामुळे रेल्वेला ४०० कोटी रूपयांचे नुकसान होणार आहे

कोव्हिड १९ चा इम्पॅक्ट म्हणून आता देशातील सर्व रेल्वे, मेट्रो, मोनोची प्रवासी वाहतूक थांबवण्याची निर्णय़ रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे मंत्री पियूष गोएल यांनीच हा महत्वपूर्ण असा निर्णय अखेर नाईलाजाने जाहीर केला आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व प्रकारची प्रवासी रेल्वे वाहतूक बंद राहील असा निर्णय पियूष गोएल यांनी घेतला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची उपनगरीय लोकल वाहतूकही यामुळे बंद राहणार आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये सेल्फ क्वारंटाईनचे स्टॅम्प असलेले प्रवासी हे रेल्वेने प्रवास करत असल्याचे आढळल्यानेच हा निर्णय़ घेण्यात आला आहे. काही प्रवाशांना सेल्फ क्वारंटाईनचा स्टॅम्प पाहून रेल्वे प्रशासनाकडून ट्रेनमधून खालीही उतरवण्यात आले होते. या प्रवाशांसोबत प्रवास करणारे इतर प्रवाशानांही याची लागण झाल्याने रेल्वेमार्फत हा महत्वाचा निर्णय समोर आला आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनचा स्टेज ३ चा धोका लक्षात घेऊनच रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अतिशय गरजेचा असल्यावरच प्रवास करा अशी मार्गदर्शके रेल्वेकडून जाहीर करण्यात आली होती. पण रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात एकाचवेळी अनेकांना संसर्ग होण्याचा धोका पाहता रेल्वेने हा निर्णय़ घेतला आहे. आज रात्री १० वाजल्यापासूनच रेल्वे बंद करण्याच्या निर्णय़ाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रेल्वेच्या या निर्णय़ामुळे जवळपास ३ हजार ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. पण झोनल रेल्वेला आपल्या स्थरावर क्षमतेनुसार ट्रेन चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांमध्ये आरक्षणाअंतर्गत सीट्स, दरवाजे, रेलिंग यासारख्या सॅनिटाईज करण्यात येत होत्या. तसेच रेल्वे स्थानकांची स्वच्छताही करण्यात येत होती. आतापर्यंत रेल्वेने प्रवाशांना देण्यात येणारी ब्लॅंकेट्स बंद करण्याचा निर्णय़ घेतला होता. एसी कोचमध्ये देण्यात येणारी ब्लॅंकेट्स धुण्यासाठी शक्य नसल्यानेच हा निर्णय घेण्यात आला होता. आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे रेल्वेला ४०० कोटी रूपयांचा तोटा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -