कल्याण शहराचे स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल

कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडया धावत असल्याने सतत स्थानक गजबजलेले दिसते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होते. स्मार्ट सिटीसंदर्भात नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर सुमारे ४१ टक्के लेाकांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Kalyan
dream city
कल्याणचे स्मार्ट सिटीच्या दिशेने पाऊल

पालिका प्रशासनाने कल्याण डोंबिवली शहराचे स्मार्ट सिटीच्या दिशेन पाऊल उचलले आहे, अशी माहिती केडीएमसीचे आयुक्त गाोविंद बोडके यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पाची माहिती दिली. स्मार्ट सिटीत एरिआ बेस डेव्हलपमेन्टच्या माध्यमातून कल्याण रेल्वे स्टेशन परिसराचा कायापालट होणार आहे. स्टेशन परिसर, एसटी बस डेपोचा विकास आणि एपीएमसी येथील मेट्रोचे स्टेशन एकमेकांशी जोडले जाणार आहे.

कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाडया धावत असल्याने सतत स्थानक गजबजलेले दिसते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होते. स्मार्ट सिटीसंदर्भात नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतर सुमारे ४१ टक्के लेाकांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या दृष्टीकोनातुनच रेल्वे स्थानक परिसराचा समावेश करण्यात आला आहे. बस स्टॅन्ड, ऑटो रिक्षा, केडीएमटी आणि इतर खासगी वाहने यांच्यासाठी वेगळा मार्ग असणार आहे. तसेच स्कायवॉक मेट्रो स्टेशनला कनेक्ट करण्यात येणार आहे, असेही बोडके यांनी सांगितले. कल्याण पूर्वेला सहा लाख लोक स्टेशनवर येत असतात. हे अंतर लांब असल्याने लोकांना पायपीट करावी लागते. सध्याचा लोकग्राम ब्रीज मोठा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या जागेत पार्किंग प्लाझा उभारणार आहे. कल्याण पूर्व रेल्वे स्थानकावर सहा प्लॅटफार्म करण्याच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सध्या रेल्वे प्रशासनाबरोबर बोलणी सुरू आहे. अद्याप याचे रेल्वे प्रशासनाकडून अजूनही उत्तर आलेले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे कल्याण डोंबिवलीत उभारण्यात येणार आहे. नदी आणि खाडीकिनारा सुशोभीकरण जलवाहतुकी सुरू होण्यासाठी कल्याण डोंबिवलीत जेट्टी उभारण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवलीत कल्याण भिवंडी ठाणे मेट्रो प्रकल्प, रिंगरूट प्रकल्प, सिटी पार्क, कल्याण स्टेशन परिसर विकास आदी प्रकल्प साकारले जाणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात कल्याण डोंबिवलीचा चेहरा बदलला जाणार आहे असेही बोडके यांनी सांगितले. कचऱ्याची समस्या महत्वाची आहे. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड येथे वेस्ट टू एनर्जीचे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. तसेच बायोगॅस प्रकल्प आणि अमृतमध्ये ड्रेनेज सिस्टीमची कामे सुरू आहेत.

टाऊन प्लॅनिंग ड्रीम प्रोजेक्ट

वाडेघर आणि सापार्डे या दोन गावात ७५० एकर जमीनीवर महापालिकेचा टाऊन प्लॅनिंग स्कीम प्रोजेक्ट साकारला जाणार आहे. शासनाची चार महिन्यात मान्यता मिळेल. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या ५० टक्के जमिनी घेतल्या जाणार आहेत. याठिकाणी रस्ते पाणी गार्डन कर्मशियल एरिआ डेव्हलप करणार आहे. शेतकयांना ४ पट फायदा देणार आहे. सध्या येथे पडीक जमिन असून एक सिटी डेव्हलप होणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे नवीन शहर वसविण्याचा आराखडा पालिकेन तयार केला आहे. त्यासाठी कोरीअन कंपनीने पुढाकार घेतला आहे. आयटी पार्क सिटी पार्क मनोरंजन नगरी उद्याने बगीचे आदी नवीन सुविधा साकारल्या जाणार आहेत. तसेच कल्याण पश्चिमेत गौरीपाडा येथे सिटी पार्क साकारण्यात येणार आहे. सिटी पार्कसाठी १ लाख २१ हजार ६०० चौरस मीटर जागा आरक्षीत आहे. महापालिकेच्या ताब्यात त्यापैकी ९३ हजार २३२ चौरस मीटर जागा आहे. सीआरझेड मध्ये ३६ हजार ६१५ चौ जागा आहे. सिटी पार्कमध्ये १७०० झाडे लावली जाणार आहे. त्यात ६७९ झाडे हिरवी ९५१ झाडे मोसमी व ७० पाम ट्री आहेत. लॅण्डस्केपिंग स्पोर्ट कॉम्पलेक्स लहान मुलांना खेळण्यासाठी जागा प्रदर्शन हॉल ७५० क्षमतेचा रंगमंच बांबू थीम रेस्टॉरंट बॉटनिकल गार्डन सीसीटिव्ही कॅमेरे जनरेटर टेक्सटाईल फॅब्रिक अम्ब्रेला आदी आहे.