घरताज्या घडामोडीचिंचोलीत दुसरा बिबट्या जेरबंद; बछड्यांची भिती कायम

चिंचोलीत दुसरा बिबट्या जेरबंद; बछड्यांची भिती कायम

Subscribe

नाशिकरोड येथून जवळच असलेल्या चिंचोली(ता.सिन्नर) येथे शुक्रवारी(दि.३१) पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. आठवडाभरात एकाच जागेवर दुसरा बिबट्या पिंज-यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी या भागात बछड्यांचीही दहशत आहे.

सिन्नर तालुक्यातील चिंचोली गावात गेल्या आठवड्यात बुधवारी(दि.२२) महादू लहानू सानप यांच्या गट नं ३१ मध्ये बिबट्या वनविभागाच्या पिंज-यात जेरबंद झाला होता. शुक्रवारी(दि.३१) पहाटे पुन्हा याच ठिकाणी लावलेल्या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाला आहे. ग्रामस्थांनी पोलीस पाटील मोहन यशवंत सांगळे यांनी वनविभागाला माहिती दिल्यावर वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वन परिमंडळ अधिकारी अनिल साळवे यांच्या पथकाने चिंचोली येथील पिंजरा ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

दारणा काठा पासून पाच ते दहा किलोमीटर अंतराच्या आत पकडण्यात आलेला हा आठवा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. दरम्यान चिंचोली गाव सिन्नर तालुक्यात येत असले तरी शिंदे गावाला लागून असल्याने या भागातही बिबट्यांनी जनावरांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -