घरCORONA UPDATE३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द

३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द

Subscribe

राज्यातील ४८३ रेशन दुकानांचे निलंबन तर ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिली.

लॉकडाऊनच्या काळात रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे पालन न केलेल्या राज्यातील ४८३ रेशन दुकानांचे निलंबन तर ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिली.

राज्यातील ९३ रेशन दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच यापुढेही स्वस्त धान्य दुकानांमध्ये काळाबाजार, वाटप करताना कमी धान्य देणे किंवा जास्त पैसे घेणे तसेच नियमांचे पालन केले जात नसेल तर कडक कारवाई करण्यात येईल,  असा इशाराही भुजबळ यांनी दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ई-पासला जून अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जून महिन्याच्या अन्नधान्य वितरणाचा आढावा, रेशनकार्ड नसलेल्या गरीबांसाठी धान्य वितरण करण्याबाबत केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करणे, स्वस्त धान्य दुकानांसाठी विमा कवच, सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे खाद्यतेल, भरडधान्य इ. वितरण करण्यासाठी नवीन योजना तयार करणे, तुरडाळ-चनाडाळ नियतन, उचल आणि वितरण तसेच शिवभोजन उद्दिष्ट या विषयांवर चर्चा झाली.

रेशन दुकानांवर कारवाई

नागपूर विभागात ७८ रेशन दुकानांचे निलंबन तर १३ दुकानांचा परवाना

- Advertisement -

अमरावती विभागात २२ रेशन दुकानांचे निलंबन तर ३२ दुकानांचा परवाना रद्द

औरंगाबाद महसूल विभागात ७१ रेशन दुकानांचे निलंबन तर ६ दुकानांचा परवाना रद्द

नाशिक विभागात एकूण ६१ रेशन दुकानांचे निलंबन तर ७३ दुकानांचा परवाना रद्द

पुणे विभागात एकूण १९५ रेशन दुकानांचे निलंबन तर १८३ दुकानांचा परवाना रद्द

कोकण विभागात ३१ रेशन दुकानांचे निलंबन तर ७ दुकानांचा परवाना रद्द

मुंबई शहरातील २५ रेशन दुकानांचे निलंबन तर ८ दुकानांचा परवाना रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -