घरमहाराष्ट्रकोल्हापुरात आजारी वडिलांची मुलाकडून गळा आवळून हत्या

कोल्हापुरात आजारी वडिलांची मुलाकडून गळा आवळून हत्या

Subscribe

कोल्हापुरात मुलानेच आपल्या वृद्ध वडिलांचा गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

वडिलांचा आजारपणाचा खर्च भागत नाही म्हणून कोल्हापूरच्या करवीर येथे मुलगा आणि चुलत्याने हत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. मृत्यूनंतर पाच महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला. मे २०१९ मध्ये नामदेव पांडुरंग भास्कर (६३) यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या शवविच्छेदन आहवालानंतर मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला होता. त्यामुळे अखेर पाच महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी नामदेव भास्कर यांची हत्या करणारा मुलगा गिरीश नामदेव भास्करला (३२) अटक केली आहे. तर गिरीशचा चुलता तुकाराम भास्करचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव भास्कर हे मजूर होते. काही वर्षांपुर्वी त्यांच्या जांगेत गाठ झाली होती. दिवसेंदिवस ही गाठ वाढत गेली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रिया करुन ती गाठ काढून घेण्यात आली. मात्र, पुन्हा दीड वर्षांनी त्यांना तसाच त्रास उद्भवला. त्यामुळे पुन्हा शस्त्रक्रिया करुन ती गाठ काढण्यात आली. या दोन्ही शस्त्रक्रियांमुळे भास्कर कुटुंबियांना प्रचंड खर्च आला. याशिवाय नामदेव यांचा औषधांचा खर्च देखील कुटुंबियांकडून पेलवत नव्हता. मे २०१९ मध्ये नामदेव यांना असह्य वेदना होऊ लागल्या. वडिलांना होणारा त्रास मुलाकडून पाहवत नव्हता. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांची या वेदनांतून मुक्ती होईल, असे नामदेव यांचा मुलगा गिरीशचे म्हणणे होते. त्यामुळे त्याने सीपीआर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून वडिलांच्या हाताची सलाईन काढली. त्याने वडिलांच्या नाकात कापसाचे बोळे घालून रुमालने नाक आणि तोंड, गळा दाबून हत्या केली. त्यानंतर सीपीआर पोलीस चौकात नामदेव यांच्या निधनाची नोंद आकस्मित मृत्यू अशी झाली. मात्र, त्यांच्या शवविच्छेदन आहवालानंतर मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवला होता. त्यामुळे अखेर पाच महिन्यांनी या खुनाचा उलगडा झाला.

- Advertisement -

हेही वाचा – आज भाजप-शिवसेनेची सत्व परीक्षा; अन्यथा युतीच्या उमेदवारांना फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -