घरमहाराष्ट्रबालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी 'मिशन मेळघाट'

बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी ‘मिशन मेळघाट’

Subscribe

मेळघाटातील काही भागांमध्ये बालमृत्यूचं प्रमाण अधिक असल्याने हे प्रमाणकमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस मेळघाटच्या दौऱ्याकरता जाणार आहेत.

बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यात देशभरात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असला, तरी अद्यापही मेळघाटातील काही भागांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे बालमृत्यू आणि कुपोषणाशी संबंधित सर्व यंत्रणांना घेऊन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे २ दिवस मेळघाटचा दौरा करणार आहेत. २२ आणि २३ फेब्रुवारीला हा दौरा असणार आहे. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्य खात्याचे प्रधान सचिव, आरोग्य संचालक, नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक, तसेच महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, वन, अन्न व नागरी पुरवठा आदी विभागांचे विभागीय पातळीवरील वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. मेळघाटातील कुपोषण आणि आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण यंत्रणा प्रथमच मेळघाटाचा दौरा करणार आहेत.

मेळघाटातील रुग्णालयांना नेब्युलायझरचे होणार वाटप

बालकांमध्ये होणारा न्यूमोनियाचा संसर्ग हे बालमृत्यूचे एक मोठे कारण आहे. त्यावर उपाय म्हणून मेळघाटातील रुग्णालयांना नेब्युलायझरचे वाटप करण्यात येणार आहे. यामुळे न्यूमोनियावरील औषधोपचार अधिक प्रभावीपणे करता येतील आणि बालमृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करता येईल. बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्याची जबाबदारी आरोग्य, महिला आणि बालकल्याण, आदिवासी विकास, वन, महसूल, अन्न आणि नागरी पुरवठा अशा विविध यंत्रणांवर आहे. मात्र या यंत्रणा स्वतंत्रपणे काम करतात. त्यामुळेच बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी आराखडा तयार करण्यासाठी सर्व यंत्रणांना एकत्र आणून आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मिशन मेळघाट’ची तयारी केली आहे. याशिवाय परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये आणि अंगणवाड्यांना भेट देणार आहेत. त्यानंतर अमरावतीच्या विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सर्व संबंधित यंत्रणांची बैठक होऊन ॲक्शन प्लॅनबाबत पुढील कार्यवाहीचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे.

- Advertisement -

वाचा – बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट ॲक्शन प्लॅन’

वाचा – पालघरमध्ये बालमृत्यू दर पन्नास टक्क्यावर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -