घरमहाराष्ट्रमुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतका तलावात पाणीसाठा!

मुंबईकरांना नऊ महिने पुरेल इतका तलावात पाणीसाठा!

Subscribe

पावसाच्या दमदार हजेरीमुळे १२ दिवसांत दुप्पट साठा

मुंबईत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. सध्या मुंबईत अधूनमधून पाऊस पडत असला, तरी धरणक्षेत्रात मात्र चांगलाच पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या 12 दिवसात पाणीसाठ्यात दुप्पट वाढ झाली आहे. 4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. आज 16 ऑगस्टला धरणांमध्ये तब्बल 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा 75.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा पुढील नऊ महिने मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे.

मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तुळशी आणि विहार या सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधून दरदिवशी 3850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात करण्यात आली. परंतु, सध्या धरण क्षेत्रात सतत पडणार्‍या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

- Advertisement -

4 ऑगस्ट रोजी सातही धरणातील पाणीसाठा 5 लाख 5 हजार 896 दशलक्ष लिटर इतका होता. परंतु तलावांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याने सध्या म्हणजेच 16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ भरायला सुमारे चार लाख दशलक्ष लिटर पाणी साठ्यात वाढ होण्याची गरज आहे. सात धरणांपैकी 27 जुलैला तुळशी तर 5 ऑगस्टला विहार तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. सध्या मुंबईत 20 टक्के पाणी कपात केली असली, तरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे. जर धरण पूर्ण भरली तर मुंबईकरावरील 20 टक्के पाणी कपात कमी होऊ शकते.

मागील दोन वर्षांपेक्षा पाणीसाठा कमीच

16 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत सातही धरणांत 10 लाख 99 हजार 445 दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आजच्याच दिवशी 13 लाख 56 हजार 012 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच 93.69 टक्के पाणीसाठा होता. आजच्याच दिवशी 2018 मध्ये 12 लाख 99 हजार 658 दशलक्ष लिटर इतका म्हणजेच ९८.७९ टक्के पाणीसाठा जमा होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -