घरमहाराष्ट्रनाशिकतडीपार गुंडाचा पोलिसावर हल्ला

तडीपार गुंडाचा पोलिसावर हल्ला

Subscribe

पोलिसांनी गुंडाला रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांवर हल्ला केला. मात्र, शिताफीने केली अटक

गुन्हेगारांवर वचक राहावा, यासाठी नाशिक आयुक्तालयातर्फे गुरुवारी (१८) रात्री ११ ते मध्यरात्री २ वाजेदरम्यान शहरात एकाच सर्वत्र मिशन ऑल आऊट राबविण्यात आले. दरम्यान, तडीपार गुंड गणेश उर्फ बाला भास्कर कालेकर (रा. हनुमानवाडी) हा रामकुंड परिसरात दहशत माजवत असल्याचे समजताच पोलिसांनी अटक करण्यासाठी धाव घेतली. त्यास रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हल्ला केला. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली.

पोलीस शहरातील सर्व रस्त्यांवर एकाचवेळी नाकाबंदी करत असताना तडीपार गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश देशमाने, दिपक गिरमे, हवालदार शिवाजी आव्हाड, संतोष नवले, नवनाथ रोकडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी कालेकर हनुमान मंदिराजवळ धारधार चाकूचा धाक दाखवून भाविकांना धमकावत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. पोलिसांना बघताच त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी गिरमे यांच्यावर कालेकरने धारधार शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी झटापट करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या इतर कर्मचार्‍यांनी त्याला जमिनीवर पाडून धरून ठेवत त्याच्या कब्जातील शस्त्र ताब्यात घेत अटक केली. कालेकरवर शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, पोलिसांवर हल्ला अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश उबाळे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -