घरमहाराष्ट्रनाशिकशीतकड्यावरुन ढकलून पतीनेच केला पत्नीचा खून, गडावरील घटना

शीतकड्यावरुन ढकलून पतीनेच केला पत्नीचा खून, गडावरील घटना

Subscribe

पत्नीचा मृत्यु,पती पोलिसांच्या ताब्यात

सप्तश्रृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पतीने पत्नीला शीतकड्यावरुन लोटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पोलिसांनी पतीसह इतर चौघांना ताब्यात घेतले आहे. शीतकड्याच्या खोल दरीत पोलिसांना मृत महिलेचे प्रेत सापडले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून बाबुलाल लक्ष्मण काडे (वय-30) व त्याची पत्नी कविता बाबुलाल काडे (वय-22) हे नवविवाहित दाम्पत्य रविवारी (दि. १४) रोजी सप्तशृंग देवीच्या दर्शनासाठी गडावर आले होते. रात्री गडावर त्यांनी मुक्काम केला. गड परिसरात पर्यटन केले. गडावर काही खरेदी केली. सकाळी सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेतल्यानंतर हे नवदाम्पत्य तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी येथील खासगी फोटोसेशन झाल्यानंतर सतीचा कडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीतकड्यानजीक हे दोघेही गेले. तेथे बाबुलाल याने पत्नीला कड्यावरून खाली ढकलून दिले. संशयित बाबूलाल याने पत्नीला ढकलून दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजुबाजुला उपस्थित असलेल्या पर्यटकांनी त्यास पडकून पोलिसांच्या स्वाधीन केले.या घटनेत पत्नी कविता हिचा मृत्यू झाला असुन मयत कविता ह्या मध्यप्रदेशातील मुरादपुर येथील होत्या.

- Advertisement -

दरम्यान,पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी शीतकड्याच्या खालील खोल दरीत कविताच्या शोधासाठी शोधकार्य केले असता मयत कविताचे प्रेत पोलिसांना आढळुन आले.यावेळी कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,पोलीस कर्मचारी शिवाजी शिंदे, योगेश गवळी,खाडे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -