घरताज्या घडामोडीदारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची कुर्‍हाडीने हत्या

दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची कुर्‍हाडीने हत्या

Subscribe

दारुच्या नशेत मुलानेच वडिलांच्या डोक्यात कुर्‍हाड मारुन हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१७) रात्री निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुकामध्ये घडली. नवरा बायकोच्या भांडणात वडील मध्यस्थी झाल्याने ही घटना घडली. पोलिसांनी सापळा रचून मुलास अटक केली आहे. बबन निवृत्ती निरभवणे (४५, रा.सोनेवाडी,ता.निफाड) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. निवृत्ती मनाजी निरभवणे (७३) असे मृताचे नाव आहे.

निवृत्ती निरभवणे यांना तीन मुले आहेत. विलास, कमलेश आणि बबन अशी मुलांची नावे आहेत. तिघांचाही विवाह झाला असून सर्वजण आईवडिलांपासून वेगळे राहत आहेत. निवृती निरभवणे हे पत्नी फुलाबाई निरभवणे (६५)सोबत राहायचे. फुलाबाई यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने त्या घरीच असतात. मधला मुलगा कमलेश हा आईवडिलांच्या शेजारील घरी राहत आहे. कमलेशचा मोठा भाऊ विलास व लहान भाऊ बबन हा पत्नी व मुलासोबत बेघरवस्तीवर राहत आहेत.
सोमवारी (दि.१७) रात्री ८ वाजता बबन निरभवणे दारुच्या नशेत हातात कुर्‍हाड घेवून बायकोला शिवीगाळ करत आईवडिलांच्या घरात घुसला. त्यावेळी त्याचे वडील मध्यस्थी झाले. ‘तू शांततेत बोल शिवीगाळ करु नको’, असे त्यांनी समजून सांगितले असता राग अनावर झाल्याने तो पत्नी सरला निरभवणे हिच्या अंगावर कुर्‍हाड मारण्यास धावला. त्यावेळी त्याचे वडील तिला वाचवायला मध्यस्थी झाले. त्यांनी त्याला हातातील काठीने घरातून बाहेर काढले. रागाच्या भरात त्याने कुर्‍हाड वडिलांच्या डोक्यात मारली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. कमलेश निरभवणे मदतीसाठी धावले असता ‘तू मध्ये पडला तर तुझेही तुकडे करील’, अशी धमकी त्याने दिली. त्यानंतर तो घटनास्थळावरुन कुर्‍हाड घेवून पळून गेला. याप्रकरणी कमलेश निवृत्ती भिरभवणे यांनी निफाड पोलीस ठाण्यात लहान भाऊ बबन निरभवणेविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.

- Advertisement -

दारुच्या नशेत पत्नी, मुलांना मारहाण
बबन निरभवणे यास दारुचे व्यसन आहे. त्यातून पतीपत्नीमध्ये नेहमीच भांडण व्हायचे. दारुच्या नशेत तो पत्नी व मुलांना मारहाण करायचा. त्याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याप्रकरणी पत्नीनेने त्याला अनेकवेळा समजून सांगितले. मात्र, त्याच्यात काहीच फरक पडला नाही.१५ दिवसांपासून बबन निरभवणेचा पत्नीसोबत कौटुंबिक वाद सुरु होता. शेवटी पत्नी त्याला सोडून १५ दिवसांपासून दोन मुलांसह सासू व सासर्‍यांकडे राहण्यास आली होती.

पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली
वडिलांची हत्या केल्यानंतर बबन निरभवणे घटनास्थळावरुन पळून गेला होता. त्याचा शोध घेतला असता तो सोनेवाडी शिवारात दिसताच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
एस.एस.शिंपी
सहायक पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -