घरमहाराष्ट्रनाशिकशाखा अभियंता निलंबित, ठेकेदार काळ्या यादीत

शाखा अभियंता निलंबित, ठेकेदार काळ्या यादीत

Subscribe

त्र्यंबक रस्ता प्रकरणी दोघांवर तातडीने कारवाई; चौकशी समितीने ठेवला ठपका

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरीपाडा या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केलेले असताना हाच रस्ता दाखवून जिल्हा परिषदेला 15 लाख रुपयांना गंडा घालणार्‍या शाखा अभियंता डी. व्ही. इंगळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. तसेच ही अभिनव कल्पना सूचविणारा ठेकेदार उत्तम बोराडे यास कायमस्वरुपी काळ्या यादीत ढकलण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी घेतला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने देखील याच रस्त्यावर काम दाखवून सबंधित ठेकेदारानेही १५ लाख रुपयांचे बिल काढले. हा प्रकार जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी उघडकीस आणले होते. अभियंता असलेल्या माळेकर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करत, या प्रकरणी सर्वसाधारण सभेत कागदपत्रांची फाईल सादर अधिकार्‍यांना गप्प केले होते. त्यामुळे अध्यक्षा शीतल सांगळे व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केली होती.

- Advertisement -

सदर समितीने त्या रस्त्यांची पाहणी करून, ठेकेदार व गावकर्‍यांशी चर्चा केली. यात समितीने प्रत्यक्ष रस्त्याचे मोजमाप केले असता तयार करण्यात आलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मानंकाप्रमाणे तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच मोजणीत रस्त्याचे आंतरही जास्त भरले होते. हा अहवाल समितीकडून तब्बल दोन महिन्यानंतर सादर झाला. यात संबंधित शाखा अभियंता इंगळे व ठेकेदार बोराडे यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यावर, सर्व दोषींवर तात्काळ कारवाई प्रस्तावित करून अहवाल सादर करण्याचे आदेश भूवनेश्वरी एस यांनी कार्यकारी अभियंता दादाजी गांगुर्डे यांनी दिले होते. त्यानुसार गांगुर्डे यांनी शाखा अभियंता इंगळे यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

ठेकेदारांकडून भरपाई करण्यात यावी

वरसविहीर ते बोरीपाडा या प्रकरणी ठेकेदारांवर काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही केली आहे. मात्र, काळया यादीत टाकून ठेकेदारांला वाचविण्याचे काम सुरू आहे. या ठेकेदारांकडून भरपाई करण्यात यावी. -रूपांजली माळेकर (सदस्या, जिल्हा परिषद )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -