Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक विजेच्या धक्क्याने देवळ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने देवळ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

वाखारवाडीच्या दत्तनगर शिवारातील दुर्दैवी घटना, मोटार चालू करायला गेले असताना लागला धक्का

Related Story

- Advertisement -

देवळा – तालुक्यातील वाखारवाडी येथे असलेल्या दत्तनगर शिवारातील शेतकरी नानाजी दशरथ निकम (वय ६०) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी (दि.९) सकाळी शेतावर पाण्याचा पंप सुरू करण्यासाठी गेले असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.

विजेचा धक्का लागल्याने निकम बेशुद्ध अवस्थेत पडले होते. बराच वेळ होऊनही वडील का येत नाही, हे पाहण्यासाठी त्यांचा मुलगा घटनास्थळी गेला. तेव्हा नानाजी निकम बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने जोरजोरात आवाज देऊन परिसरातील शेतकऱ्यांची मदत मागितली. सर्वांनी तातडीने नानाजी यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. योगेश निकम यांच्या तक्रारीवरून देवळा पोलिसांनी पंचनामा केला आहे. नानाजी निकम हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. परिवाराची जबाबदारी त्याच्यावर होती. त्यांच्या पच्यात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे आहेत असा परिवार आहे. निकम कुटुंबाला सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -