शेतकरी- महापालिका अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

स्थानिक नागरिकांनी ऑनलाईन तक्रार दिल्याने कारवाई

konarknagar bazar

पंचवटी येथील गणेश मार्केटमध्ये मंगळवारी शेतकरी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये बाजार भरण्यावरून झालेल्या कारवाई दरम्यान हाणामारी झाली. स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार दिल्यामुळे पंचवटी पालिका अधिकारी, कर्मचारी आणि आडगाव पोलीस यांनी संयुक्तपणे कारवाई केली.

दरम्यान, विक्रीसाठी आणलेला माल, भाजीपाला पालिका अधिकाऱ्यांकडून जप्त करण्यात आला. यावेळी गोंधळ घालणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली असून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाजारात मास्क न वापणार्यांवर देखील कारवाई करण्यात आली.