घरमहाराष्ट्रनाशिकचारा, पाण्याअभावी येवल्यातील पशुधन बाजारात

चारा, पाण्याअभावी येवल्यातील पशुधन बाजारात

Subscribe

तालुक्यात दुष्काळाची व्याप्ती वाढली असून त्याचा चटका पशुधनालादेखील बसला आहे.

शासनाने दुष्काळ जाहीर करून सुध्दा अद्यापपर्यंत कुठल्याही उपाययोजना केल्या नसल्याने तालुक्यात मोठी समस्या निर्माण झाली आहे. तालुक्यात दुष्काळाची व्याप्ती वाढली असून त्याचा चटका पशुधनालादेखील बसला आहे. शेतकर्‍यांसाठी मोठी कुचंबणा झाली असून जनावरे आठवडे बाजारात विक्रीस आणले आहे. परंतु, त्यांना सुद्धा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. चार्‍याचा प्रश्न गंभीर झाल्याने चार्‍यासाठी जनावरे भटकंती करताना ग्रामीण भागात दिसत आहे. चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होता. मात्र, सध्याच्या दुष्काळामुळे चारा व पाण्याची मोठी समस्या निर्माण झाल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या जनावरांचा, मेंढपाळांचा प्रश्न छोटा-मोठ्या तांड्यावर गंभीर होत चालला आहे. जनावरांना पाणी पाण्यासाठी शेतकरी वर्गाला मोठी कसरत करावी लागत असून विविध प्रयोग करावे लागतात. प्रशासनाने चार्‍याच्या उत्पादनात देखील घट झाली असून चार्‍याला प्रचंड मागणी आहे. यामुळे बळीराजा दिवसेंदिवस काळजीत पडला आहे. प्रशासनाने याबाबत लवकरात निर्णय घ्यावा, ताबडतोब डेपोंची व्यवस्था करण्यासंबंधी पाऊल उचलावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेला जाहीर केलेले अनुदान व सवलती तरी निदान लवकर द्याव्यात, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

त्वरित उपाययोजना कराव्यात

सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाभयंकर परीस्थिती आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई असून पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी हतबल झाला आहे. शासनाने याबाबत गंभीरतेने विचार करून त्वरित उपाययोजना कराव्यात. – धनंजय गिडगे, शेतकरी, ममदापूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -