घरमहाराष्ट्रनाशिकमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; गॅस टँकरला गळती

मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; गॅस टँकरला गळती

Subscribe

जुन्या कसारा घाटात सोमवारी, ४ मार्चला सकाळी हिंदुस्थान पेट्रोलियमचा गॅस टँकर उलटल्याची घटना घडली. हा टँकर मुंबईहुन नाशिककडे येत होता. गॅस टँकरची गळती थांबविण्याचे प्रयत्न दुपारपर्यंत सुरू होते. सुरक्षेचा भाग म्हणून नाशिककडे जाणारी वाहतूक नव्या घाटातून वळविण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरील जुन्या कसारा घाटात सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा गॅस भरलेला टँकर मुंबईहुन मनमाडकडे जात होता. या टँकरला अज्ञात वाहनाने कट मारल्याने टँकर चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेला टँकर रस्त्यावरच उलटला. सुदैवाने मोठी दुर्घटना मात्र टळली. या घटनेची माहिती मिळताच हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे सेफ्टी मॅनेजर अखिल पंचोरी, टोल प्लाझाचे पेट्रोलिंग कर्मचारी फिरोज पवार, जावेद खान, समाधान चौधरी, दीपक उघाडे, नवनाथ गुंजाळ, विक्रम खाजेकर, सुरेश जाधव, राहुल पुरोहित, सुरज आव्हाड, विजय कुंडगर, महामार्ग रस्ता सुरक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे, पोलीस हवालदार योगेश पाटील, संतोष माळोदे, बी. सी. चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच सुरक्षाच्या दृष्टीने तातडीने या महामार्गवरील वाहतूक नवीन कसारा घाटातुन वळविण्यात आली. दरम्यान, गॅस गळती बंद करण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. गळती थांबविण्याचे प्रयत्न दुपारपर्यंत सुरू असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -