घरमहाराष्ट्रनाशिकतलाठी परीक्षेचे लॅन सर्व्हर डाऊन

तलाठी परीक्षेचे लॅन सर्व्हर डाऊन

Subscribe

व्ही एन नाईक पॉलिटेक्निक केंद्रावर शंभर विद्यार्थी परीक्षा न देताच माघारी

राज्यभर महापरीक्षेंतर्गत येथे सुरु असलेल्या तलाठी परीक्षा केंद्रावर आज सर्व्हरच डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच घरी जावे लागले आहे. पुढील सत्र सुरु करावयाचे असल्याने परीक्षा केंद्रप्रमुखांनी विद्यार्थ्यांना परीक्षा रिशेड्युल होणार असल्याचे सांगितले.

राज्यभर महापरीक्षेंतर्गत तलाठी या पदासाठी २ जुलै पासून परीक्षा घेण्यात येत आहे. आज(दि.२३) रोजी शहरातील व्ही.एन. नाईक पॉलिटेक्निक महाविद्यालय केंद्रात सकाळच्या सत्राच्या परीक्षेवेळी तांत्रिक बिघाड होऊन लॅन नेटवर्क सर्व्हर डाऊन झाले. केंद्रावरील प्रतिनिधींनी अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न केले मात्र लॅन सर्व्हर मधील बिघाड त्यांच्या लक्षात न आल्याने केंद्र-प्रतिनिधींनी महा आयटी जिल्हा व्यवस्थापक अभियंत्यांना पाचारण केले. त्यांनी तात्काळ केंद्रावर दाखल होत लॅन सर्व्हर मधील दोष दूर केले; मात्र पहिल्या सत्राच्या परीक्षेचा इन-टाईम संपल्याने परीक्षेला न बसन्याची नामुष्की विद्यार्थ्यांवर आली. पहिल्या सत्रात रद्द झालेली हि परीक्षा शनिवारी (दि.२७) घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

या वेळी जिल्हा महा आय टी व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना एका वर्गात बसवून विद्यार्थ्यांना अडचण समजावून सांगितली आणि राज्य महापरीक्षा समन्वयकांसोबत संवाद साधून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केव्हा होतील याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांची पुनर्परीक्षा केव्हा होईल याबाबत पोर्टल वर त्याचसोबत त्यांच्या इमेल आणि मोबाईल वर एसएमएस स्वरूपात कळविले जाणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -