घरमहाराष्ट्रनाशिकपाऊस होऊनही मराठवाड्याला चिंता नाशिकची

पाऊस होऊनही मराठवाड्याला चिंता नाशिकची

Subscribe

मराठवाड्यात पाऊस होत असला तरी येथील स्थानिक स्वराज्यसंस्था, सिंचन संस्था, शेतकरी नागरिकांची नाशिक जिल्ह्यातील पावसाकडे नजर लागलेली आहे.

सोमनाथ ताकवाले, नाशिक

मराठवाड्यात पाऊस होत असला तरी येथील स्थानिक स्वराज्यसंस्था, सिंचन संस्था, शेतकरी नागरिकांची नाशिक जिल्ह्यातील पावसाकडे नजर लागलेली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जायकवाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र नाशिकमधील इगतपुरी, त्र्यंबक, नाशिक, दिंडोरी तालुके असल्याने या भागात कसा पाऊस आहे, याची माहिती मराठवाड्यातील शेतकरी, नागरिकांकडून घेतली जात आहे.

- Advertisement -

जायकवाडीला धरणाला सर्वाधिक विसर्ग होणार्‍या इगतपुरीच्या दारणा,मुकणे आदी धरणांच्या पाणलोठ क्षेत्रात पावसाने उशीराने हजेरी लावली आहे. तालुक्यात आतापर्यंत 462 मिलीमीटर पाऊस झाल्याने धरणांमध्ये तुरळक भर पडली आहे. तसेच गंगापूर, करंजणवण धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबक, दिंडोरी तालुक्यातही पावसाचे उशीरा आगमण झालेले आहे. येथे होणार्‍या पावसाने जायकवाडी धरणातील साठा वाढण्यास सुरुवात होत असते. यंदा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणाने तळ गाठलेला आहे. या धरणात बुडलेल्या नेवासा, शेवगाव, पैठण,गंगापूर तालुक्यातील गावे, मंदिरे, रस्त्यांचे दर्शन नागरिकांना झालेल्या आहे. त्याचबरोबर धरणाच्या 25 टीएमसी असलेल्या मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्यासाठी धरणाच्या उघड पडलेल्या तळातून चर खोदून पाणी जॅकवेलपर्यंत आणण्यात आलेले होते. औरंगाबादसह, जालना, परभणी, बीड, उस्मनाबाद जिल्ह्यात 23 जूनपासून हजेरी लावलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून हजेरी लावलेली आहे. मात्र, जिल्ह्यातील धरणक्षेत्रांत पाऊस कमी प्रमाणात झाल्याने मराठवाड्यातील नागरिकांना याची चिंता लागली आहे.

पाणलोट क्षेत्रातील पाऊस (1 जुलैपर्यंत)

नाशिक – 175 मि.मी.
त्र्यंबक – 108 मि.मी.
घोटी – 331 मि.मी.
इगतपुरी – 462 मि.मी.
अंबोली – 190 मि.मी.

- Advertisement -

साठ्याचे प्रमाण

धरण – गतवर्षी – यंदा (प्रमाण दलघफूमध्ये)
गंगापूर – 1820 – 738
दारणा – 1479 – 532
मुकणे – 66 – 155

जायकवाडीत 9 टक्के मृतसाठा

जायकवाडी धरणात गत पावसाळ्यात सुमारे 47 टक्के जलसाठा झाला होता.धरणाची एकूण साठवण क्षमता 104 टीएमसी एवढी आहे. 2016नंतर धरणात कमालीचा पाणीसाठा घटल्याचे चित्र यंदा पहायला मिळाले आहे. धरणाची पाणीपातळी मृतसाठ्यात गेली असून अवघा 9.11 टक्के साठा शिल्लक आहे. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस जोमदार झाल्यास धरणांतील पाणीपातळी वाढू शकते, अशी माहिती शाखा अभियंता दाभाडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -