घरमहाराष्ट्रनाशिकअल्पवयीन मुलीला फुस लावून सामूहिक बलात्कार

अल्पवयीन मुलीला फुस लावून सामूहिक बलात्कार

Subscribe

एक महिन्यापासून अत्याचार; एकास अटक, एक फरार

मामाच्या घरी आलेल्या शिर्डी येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर तब्बल एक महिना सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीला विविध ठिकाणी नेत, हातपाय बांधून दोघांनी वारंवार बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलीने नातेवाईकांना संपर्क साधत संगमनेर येथे असल्याची माहिती दिल्यानंतर मुलगी व युवकाला ताब्यात घेण्यात आले. उपनगर पोलिसांनी एका नराधमास हवाली केले असून, एक जण फरार आहे. याप्रकरणी पोक्सो व सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिर्डी येथील अल्पवयीन मुलगी उपनगर हद्दीतील मामाकडे सुट्यांमधे आली होती. ती १८ एप्रिल रोजी उपनगर हद्दीतून हरविल्याची नोंद उपनगर पोलिसांत करण्यात आली होती. श्रीरामपूर येथील अविनाश माकुणे, संतोष खरात (रा. श्रीरामपूर) यांनी या मुलीला फुस लावून पळवून नेत सिन्नर मार्गे मालेगाव नेले. तेथून बसने सुरतला एका फ्लॅटमध्ये तिच्यावर बलात्कार केला. तेथून नवी मुंबई येथील धनसोली येथे गेल्यावर अविनाश माकुणे याने मद्यप्राशन करुन बलात्कार करताना मुलीने विरोध केला असता तिचे हात पाय बांधून, चाकूचा धाक दाखवत पाशवी बलत्कार केला. १९ मे रोजी संगमनेर येथे आल्यावर मुलीने नातेवाईकांना मोबाईलवरून माहिती दिली. त्यांनी मुलगी व अविनाश माकुणे यांना ताब्यात घेत उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. उपनगर पोलिसांत अविनाश माकुणे व संतोष खरात यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा राऊत तपास करत आहेत.

- Advertisement -

महिला अधिकार्‍यांकडे तपास

उपनगर पोलीस ठाण्यात महिलांच्या बाबतीत संवेदनशील तक्रारींबाबत तपासासाठी महिला पोलीस अधिकार्‍यांची कमी असल्याने नाशिकरोड येथील महिला अधिकार्‍यांकडे तपास देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -