घरमहाराष्ट्रनाशिकसैराटचा खून करून राजू फरार

सैराटचा खून करून राजू फरार

Subscribe

नाशिकरोड फाटा येथील गोकुळ ढाब्यावर काम करणार्‍या दोन वेटरमध्ये वाद होऊन सैराट नावाच्या वेटरचा शनिवारी पहाटे चाकूने वार करून खून करण्यात आला.

नाशिकरोड फाटा येथील गोकुळ ढाब्यावर काम करणार्‍या दोन वेटरमध्ये वाद होऊन सैराट नावाच्या वेटरचा शनिवारी पहाटे चाकूने वार करून खून करण्यात आला. फरार झालेल्या वेटरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने तपासातील अडथळे वाढले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथील गोकुळ ढाब्यावर काम करणारे राजू व ओमप्रकाश उर्फ सैराट हे काही दिवसांपूर्वीच हॉटेलमध्ये कामाला आले होते, शनिवारी पहाटेच्या दरम्यान दोघांमध्ये वाद झाला, या राजू याने सैराट नावाच्या वेटरच्या पोटात, हातावर, डोक्यात, मानेवर चाकूने वार केले, सकाळी मालक बबन सुकदेव झाडे हे सकाळी साडेआठ वाजता हॉटेलवर आले असता तिथे आधीच उभे असलेले संजय जाधव हे उभे होते, त्यांनी जवळ बोलावून आत सैराट जखमी अवस्थेत पडलेला दिसला, अत्ववस्थ स्थितीत असलेल्या ओम प्रकाशला विचारण्याचा प्रयत्न केला परंतू त्याने शांत झोपू द्या एवढेच वाक्य बोलला, यानंतर बबन झाडे यांनी येथील टोल नाक्यावरील अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्यात जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतांना ओमप्रकाशचा मृत्यू झाला, घटना समजताच उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त ईश्वर वसावे, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, आदींसह घटनास्थळी जाऊन माहिती घेतली, राजू विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. सैराटच्या हात, कपाळ, मान, डोके व पोटावर चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केलेले होते, परंतु यामुळे घटनास्थळी रक्ताचा एकही डाग दिसुन न आल्याने खुन नेमका केला कोणी याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -