घरमहाराष्ट्रनाशिकशहरातील २००४ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत

शहरातील २००४ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत

Subscribe

महापालिकेच्या वतीने शहरातील सर्व विभागांत व्यापक मोहीम

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्राहकांविरोधात हाती घेतलेल्या मोहीमेंतर्गत महापालिकेने सोमवारपर्यंत, २० मे शहरातील २ हजार ४ ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडीत केला. थकबाकीदारांमध्ये सर्वाधिक ग्राहक हे नाशिकरोड विभागात आहेत.

महापालिकेच्या कारवाईत सातपूर विभागातील २३७, पंचवटी विभागातील ४५७, नाशिक पश्चिम – २४५, नाशिक पूर्व – १९६, सिडको – ५५६ आणि नाशिकरोड विभागातील ३१३ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन्स खंडीत करण्यात आले. ऐन उन्हाळ्यात उघडलेल्या या मोहीमेमुळे लहान रक्कम असलेल्या थकबाकीदारांमध्ये धास्ती असताना, अनधिकृत नळ कनेक्शन्सचा मुद्दादेखील चव्हाट्यावर आला आहे. नाशिकमध्ये सर्वच विभागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात असलेल्या अशा कनेक्शन्समुळे प्रामाणिक ग्राहकांवर अन्याय होतो आहे. विशेषतः वडाळा गाव, जुने नाशिक, अंबड, जेलरोड या भागांत अशा कनेक्शन्सची संख्या मोठी आहे. यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होऊन, त्याचा नाहक भुर्दंड नाशिककरांना सोसावा लागतो आहे. त्यामुळे महापालिकेने अशा ग्राहकांविरुद्धदेखील व्यापक मोहीम राबविण्याची गरज आहे.

- Advertisement -

२५ हजारांवर थकबाकी असलेले २ हजार ग्राहक

नाशिक शहरात २५ हजारांवर थकबाकी असलेले एकूण १९९७ ग्राहक आहेत. याशिवाय १५ ते २५ हजारांदरम्यान ५ हजार ३३ ग्राहक आहेत. सर्वाधिक धकबाकी नाशिकरोड विभागात असून, सर्वात कमी नाशिक पश्चिम विभागात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -