घरमहाराष्ट्रनाशिकCORONA : ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर हवे!

CORONA : ऑक्सिजन बेड्सचे कोविड सेंटर हवे!

Subscribe

मनमाडला आरपीआर आक्रमक; पालिकेसमोर केले धरणे आंदोलन

मनमाड : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता येथे ऑक्सिजन बेड असलेलले कोविड सेंटर सुरू करावे, यासाठी आरपीयने आक्रमक भूमिका घेतली असून नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार मुंडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवणे यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. आठ दिवसांत ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

मनमाड शहरात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला असून कोरोनाबाधितांची संख्या 550 पर्यंत गेली आहे. ही संख्या स्वॅब दिलेल्यांची असून अनेकांनी भीतीपोटी स्वॅब दिले नसून घरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अनेकांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र, वेळेवर बेड मिळत नसल्याचेही दिसतेय. त्यामुळे मनमाड शहरात ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी आरपीआय आक्रमक झाली असून नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पालिकेचे मुख्याधिकारी मुंडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नरवणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून चर्चा केली. शहरात ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु करण्याबाबत तसेच हॉस्पिटल आणि रेल्वेचे हॉस्पिटल यांची पाहणी करण्यात आली असून यापैकी एक ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहे. लवकरच वरिष्ठ अधिकारी याबाबत निर्णय घेणार आल्याचे त्यांनी सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, शिवाय प्रांताधिकारी कासार यांनीदेखील आंदोलनकर्त्यांसोबत फोनवर चर्चा करून लवकरच ऑक्सिजन बेड कोविड सेंटर सुरु करण्याबाबत आश्वासन दिले.

- Advertisement -

एका आठवड्यात कोविड सेंटर सुरु नाही झाले तर आरपीआयतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष राजेंद्र आहिरे, नगरसेवक गंगाभाऊ त्रिभुवन यांनी दिला. यावेळी गुरु निकाळे, प्रमोद आहिरे, मोजेस साळवे, दिनकर कांबळे, रवींद्र खैरनार, पाप शहा, विलास आहिरे, सादिक शेख, बाबा शेख, भीमराव उबाळे, महेंद्र वाघ, सुरेश जगताप, राजू ठेंगे, रिजवान शेख उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -