घरमहाराष्ट्रनाशिक१२०० झाडे लावून सीरिन मीडोजच्या रहिवाशांनी फुलवले जंगल

१२०० झाडे लावून सीरिन मीडोजच्या रहिवाशांनी फुलवले जंगल

Subscribe

जपानमधील मियावाकी फॉरेस्टच्या धर्तीवर केशव सृष्टी या संस्थेने पडीक दोन हजार स्केअर फूट जागेवर उभारला प्रकल्प

विकासाच्या लाटेत मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असताना, गंगापूर रोडवरील सीरिन मीडोज् येथील रहिवाशांनी मात्र  जपानमधील मियावाकी फॉरेस्टच्या धर्तीवर तब्बल १२०० झाडे लावून जंगल फुलवले आहे. केशव सृष्टी या संस्थेने कॉलनीतील पडीक दोन हजार स्केअर फूट जागेवर उभारलेला हा नाशिकमधील हा पहिलाच प्रकल्प आहे. रविवारी या जंगलाचे औपचारिक उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी डॉ. जे. बी. संगेवार यांच्या हस्ते फीत कापून या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. एचडीएफसी लाईफ यांच्या आर्थिक सहकार्यातून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. यावेळी एचडीएफसी लाईफचे उपाध्यक्ष सुब्रतो रॉय, केशव सृष्टीचे सचिव विनय नथानी, पर्यावरण तज्ज्ञ मोहमद दिलावर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी मदन संघी, मधुकर भंडारे, उदय बेहेरे, अनिल रावते, भूपेन छतपार, प्रमोद मुळे, शैलेश पहलवानी, लतिका कुलकर्णी व माधुरी भंडारे, अजय ठक्कर आदी प्रयत्नशील होते. माया संघी यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

- Advertisement -

काय आहे मियावाकी?

जपानमधील वनस्पती शास्त्रज्ञ अकीरा मियावाकी विकसित केलेल्या पद्धतीला त्यांचे नाव दिले गेले. ओसाड वा रिकाम्या भूभागवर जलद गतीने जैव विविधता राखून वृक्ष संपदा रुजवणे व तिचे संवर्धन करणे हा या पद्धतीचा उद्देश आहे. त्यात नैसर्गिक जंगल पट्टयाचा जैव विविधतेचा आलेख तयार केला जातो, त्यासाठी आवश्यक विविध जातीची रोपे तयार केली जातात, जमीन २ ते ३ फूट चर खणून घेतले जातात, निघालेल्या मातीत सेंद्रीय खत मिसळून ही माती पुन्हा चरात टाकली जाते. काही दिवस पाणी टाकून नंतर रोपांची लागवड केली जाते. त्यातही झाडांच्या प्रकारांची सरमिसळ केली जाते. लागवडीनंतर रोपांभोवती पालापाचोळा टाकला जातो. जेणेकरुन ऊन असतानाही पाणी टिकून राहते. त्यानंतर रोपांना नियमित पाणी दिले जाते. तीन वर्षे या झाडांची निगा राखली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -