घरमहाराष्ट्रनाशिकसुदृढ आरोग्यासाठी धावले भुसावळकर; ६०० स्पर्धकांनी घेतला सहभाग

सुदृढ आरोग्यासाठी धावले भुसावळकर; ६०० स्पर्धकांनी घेतला सहभाग

Subscribe
शहरात सलग दुसर्‍यावर्षी झालेल्या स्पर्धेर्चे शहरवासियांनी स्वागत केले. पहाटेच्या गुलाबी थंडीत तीन गटात एक हजार ६०० स्पर्धक धावपटूंसह महिला, तरुण-तरुणी आणि आबालवृद्धांनीही स्पर्धेत सहभाग घेतला. निरामय आणि सृदृढ आरोग्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित ‘रन भुसावळ रन’ स्पर्धेला रविवारी (दि. १३) भुसावळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटे आल्हाददायी वातावरणात झालेल्या आणि अत्यंत काटेकोर नियोजन असलेल्या स्पर्धेने भुसावळकर सुखावले. पोलीस प्रशासनाला धन्यवादही दिले. स्पर्धेत पुरूषांमधून विशाल कुंभार तर महिलांमधून अश्विनी कटोले विजेते झाले.
स्पर्धेचा शुभारंभप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे अध्यक्ष कुंदन ढाके, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, नगरसेवक प्रमोद बर्‍हाटे, उद्योजक मनोज बियाणी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य अनिकेत पाटील, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, संदीप देशमुख, आमदारांच्या पत्नी रजनी सावकारे, संगीता बियाणी आदींची उपस्थिती होती.
तीन, पाच आणि दहा किलोमीटर अशा तीन गटात स्पर्धा झाली. १२ वयोगटाच्या स्पर्धकापासून वयाच्या पंच्याहत्तरी गाठलेल्या चिरतरूण स्पर्धकांनी भाग घेत उत्साह वाढवला. पोलीस प्रशासनाने स्पर्धेदरम्यान अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने धावपटूंची कुठलीही गैरसोय झाली नाही. आयोजकांसह नियोजन समितीच्या कार्यकर्त्यांना स्पर्धकांना मार्ग कळवण्यासाठी स्वयंसेवकही नेमले होते. मार्गावर धावपटूंसाठी लिंबू सरबतासह पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तर चौका-चौकात नागरिकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्पर्धकांचा उत्साह वाढवला. स्पर्धेसाठी आमदार संजय सावकारे यांच्यासह सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक कुंदन ढाके आणि बियाणी ग्रुपचे मनोज बियाणी, गोदावरी फाऊंडेशनचे डॉ. उल्हास पाटील प्रमुख प्रायोजकांसह आणि अन्य दात्यांचे सहकार्य लाभले. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

स्पर्धेचे विजेते असे

१० किमी पुरूष गटातून विशाल कुंभार विजेते ठरले. कुंभार यांनी गतवर्षीदेखील याच स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. द्वितीय सुरेश वाघ, तृतीय सार्थक पाटील. महिलांमध्ये प्रथम अश्विनी कटोले, द्वितीय कांचन राठोड, तृतीय दीपा बाविस्कर यांनी यश मिळवले. विजेत्यांना पारितोषिक, रोख रक्कम देवून गौरवण्यात आले.

सेल्फि पॉईंट आकर्षण

यंदा स्पर्धेसाठी विशेष करून सेल्फी पॉईंटचे आकर्षण राहिले. त्यात लव्ह भुसावळच्या प्रतिकृतीसभोवती उभे राहून अनेकांनी सेल्फी काढले. याशिवाय छोटा भीमसोबत सेल्फी काढण्यात आले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -