घरमहाराष्ट्रनाशिकशिरपूरचे प्रांत बादल यांच्यावर वाळू तस्करांचा हल्ला

शिरपूरचे प्रांत बादल यांच्यावर वाळू तस्करांचा हल्ला

Subscribe

महसूल कर्मचार्‍यांनी या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांना अटक करण्याची केली मागणी

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करुन तहसील कार्यालयात आणत असताना शिरपूरचे प्रांत डॉ. विक्रमसिंग बादल यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला चढवल्याची घटना गुरूवारी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून महसूल कर्मचार्‍यांनी या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे.

शिरपूर तालुक्यातील तापी नदीमधून मोठया प्रमाणावर रेतीचा उपसा केला जातो आहे. यासाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता तस्करांनी दहशत पसरवून रेती तस्करीचे काम सुरू ठेवले आहे. याचा फटका प्रांताधिकारी डॉ. बादल यांना बसला आहे. गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी बांदल वाघाडी रस्त्याने जात असताना त्यांना रेतीचा ट्रॅक्टर दिसला. त्यांची चालकाला थांबवून चौकशी केली. बेकायदेशीर रेती उपसा केल्याचा प्रकार दिसल्याने त्यांनी ट्रॅक्टर जप्त करुन तहसील कार्यालयात नेण्यासाठी चालकाला सुचवले. त्यानुसार ट्रॅक्टर पुढे व बांदल यांचे वाहन मागे ठेवून प्रवास सुरू झाला. हे वाहन वाघाडी टी-पॉईंटजवळ थांबले. यामुळे बादल खाली उतरताच अन्य वाहनाने आलेल्या रेती तस्करांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

- Advertisement -

एकदम झालेल्या या मारहाणीमुळे बांदल यांच्यासह त्यांच्या वाहनातील कर्मचारी देखिल हबकले. दरम्यान हल्लेखोरांनी ट्रॅक्टरसह पळ काढला. या घटनेनंतर बादल यांनी शिरपूर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली. यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे व अन्य जवाबदार अधिकार्‍यांनी शिंरपुरकडे धाव घेवुन बादल यांची भेट घेतली. तर शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी घटनास्थळानजीकचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -