घरमहाराष्ट्रनाशिकखात्यातून परस्पर ७२ हजार गायब, एसबीआय ग्राहकाला गंडा

खात्यातून परस्पर ७२ हजार गायब, एसबीआय ग्राहकाला गंडा

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ७२ हजार परस्पर ट्रान्स्फर एकाने खातेदाराला गंडा घातल्याची घटना पुढे आली.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून ७२ हजार ट्रान्स्फर झाल्याचे एसएमएस एका खातेदाराला त्याच्या मोबाईलवर येताच त्याने एसएमएस पाठवणार्‍याला फोन केला असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यातून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खातेदार विकासकुमार श्रीधर्मवीरसिंग जटराणा (३०, रा.बोरगड, म्हसरूळ) म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

जटराणा ३ मे रोजी सकाळी मोबाईल घरी ठेवत कामावर गेले. कामावरून घरी आले असता त्यांच्या मोबाईल (813930536) वर दोन मोबाईल क्रमांकावरून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून अनुक्रमे ३५ हजार, ३५ हजार व २ हजार ६०० रुपये असे ७२ हजार ६०० रुपये ट्रान्सफर झाल्याचे संदेश दिसले. जटराना यांनी मोबाईलधारकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यातून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी जटराणा यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. जी. रोहोकले तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -