कर्ज मंजुरीसाठी बँक कर्मचार्‍यास धमकावले

युनियन बँकेने मुद्रा लोन कर्ज योजनेअंतर्गत कागदपत्रात त्रुटी दाखवून कर्ज नामंजूर केल्याचा राग अनावर झाल्याने एकाने बँक कर्मचार्‍यास शिवीगाळ व दमदाटी केली.

Nashik
Threatening
प्रातिनिधीक फोटो

नाशिकमध्ये युनियन बँकेने मुद्रा लोन कर्ज योजनेअंतर्गत कागदपत्रात त्रुटी दाखवून कर्ज नामंजूर केल्याचा राग अनावर झाल्याने एकाने बँक कर्मचार्‍यास शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. अजय राधाकृष्ण धंजल (रा. शांतीनिकेतन सोसायटी, कुणाल हॉटेलमागे, पंचवटी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

शक्ती प्रसाद रथ हे अमृतधाम येथील युनियन बँकेच्या शाखेत काम करतात. अजय धंजल याने शाखेत मुद्रा लोन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, धंजल हे दुसर्‍या बँकेचे थकबाकीदार असल्याने व त्यांच्या अर्जातील कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याने त्यांचे कर्ज मंजूर झाले नाही. त्याचा राग अनावर झाल्याने धंजल याने रथ यांच्या केबिनमध्ये येत शिवीगाळ व दमदाटी केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रथ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here