घरमहाराष्ट्रनाशिककर्जाला कंटाळून निफाडला शेतकर्‍याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून निफाडला शेतकर्‍याची आत्महत्या

Subscribe

निफाड तालुक्यातील शिंगवे येथील अल्पभुधारक शेतकरी सुभाष यशवंत शिंदे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.

निफाड तालुक्यातील शिंगवे येथील अल्पभुधारक शेतकरी सुभाष यशवंत शिंदे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
गत पाच वर्षापासून शेतमालाला भाव नसल्याने तसेच कर्जाचा डोंगर उभा राहिल्याने दोन वर्षांपूर्वी एकर जमीन विकून कर्ज फेडू, असे शिंदे यांना वाटले. पंरतु, जमीन विकूनही कर्ज फिटले नाही. यात नवीन कर्ज वाढले. यामुळे गळफास घेऊन सुभाष शिंदे यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

सदर घटना सोमवारी (८ एप्रिल) घडली. सुभाष शिंदे यांच्यावर पतसंस्था ५० हजार, एचडिएफसी क्रेडिट कार्डवर ५० हजार आणि १ लाख रुपये खासगी सावकारी कर्ज होते. अनेक दुकानदार आणि नातेवाईकांची उधारी झाली होती. केवळ अर्धा एकर जमीन शिल्लक असल्याने यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे जिकरीचे झाले होते. यात बाजारभाव, नैसर्गिक आपत्ती, कुटुंबाचा वाढता खर्च, शेतीसाठी लागणारे भांडवल आणि उत्पादनाचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी करंजगाव, कोठूरे रस्त्यावर असलेल्या चिंचेच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्यामागे पत्नी सरला, मुलगा राहुल, मुलगी रुपाली, असा परिवार आहे. निफाड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -