जि. प. ठेकेदारांमध्ये सिने-स्टाईल हाणामारी

कामांच्या निविदा भरण्यावरुन जिल्हा परिषदेच्या दोन ठेकेदारांमध्ये सिने-स्टाईल हाणामारी झाल्याचे समजते. सकाळी हा प्रकार घडत नाहीतोच, सायंकाळच्या सुमारास बांधकाम विभाग एकमध्ये एक ठेकेदार व अधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. यात अगदी फाईलमधील कागदांची फाडाफाडी झाल्याचे बोलले जाते. इतर ठेकेदारांनी मध्यस्ती करत या वादावर पडदा टाकला.

Nashik
car driver beaten up by drunken police in nashik
मद्यधुंद पोलिसांचा राडा; पोलिसांवर गुन्हा दाखल

निविदा कक्षात दोन ठेकेदार एकमेकांसमोर कामनिमित्त आले असता दोघांमध्ये वाद झाले. अगदी एकमेकांवर हात उचलत दोघांनाही हाणामारी केल्याची चर्चा आहे. जुन्या वादातून हा प्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. यात एकमेकांविरोधात तक्रारी झाल्याचे बोलले जात आहे. हा वाद शमत नाहीतोच, सायंकाळी बांधकाम विभागात एक ठेकेदार व विभागातील अधिकारी यांच्यात फाईल काढण्यावरून वाद झाला. हा वाद अगदीच टोकाला गेला, यात संतप्त झालेल्या ठेकेदारांनी थेट फाईलमधील कागद फाडल्याची चर्चा आहे. तर, अधिकार्‍यांनाही ठेकेदारांविरोधात लेखी तक्रार करण्याची भाषा केली. यातच काही ठेकेदार व अधिकारी, कर्मचार्‍यांनी मध्यस्ती करत हा वाट मिटविल्याचे समजते.