घरताज्या घडामोडीलोकसभेत प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळेंनी मारली बाजी

लोकसभेत प्रश्न विचारण्यात सुप्रिया सुळेंनी मारली बाजी

Subscribe

लोकसभेत सर्वात अधिक प्रश्न विचारण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. तर डॉ. सुभाष भामरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

लोकसभेत सर्वात अधिक प्रश्न विचारण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आहे. सुप्रिया सुळे लोकसभेत सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या आहेत. लोकसभेत खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत तसेच विविध मुद्द्यांवरील चर्चेतील सहभागाबाबत ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रीसर्च’ संस्थेने केलेल्या पहाणीत सुप्रिया सुळे या पहिल्या क्रमांकावर आहेत. तर विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यानंतर सुभाष भामरे हे सर्वाधिक प्रश्न विचारणारे खासदार ठरले असून टॉप टेनमध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे.

सुप्रिया सुळेने उपस्थित केले १६७ प्रश्न

संसदीय अधिवेशनांमध्ये मे ते डिसेंबर २०१९ या काळाचत सुप्रिया सुळे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान लोकसभेत एकूण १६७ प्रश्न उपस्थित केले होते. तर विविध ७५ राष्ट्रीय विषयांवरील चर्चांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतान जनेतेच्या संदर्भातील प्रश्न मांडले. त्याचबरोबर महिलांचेही प्रश्न उपस्थित केले. विशेष म्हणजे लोकसभेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या पहिल्या १० खासदारांमध्ये महाराष्ट्रातील ६ खासदार असून त्यात सुप्रिया सुळे अव्वलस्थानी आहेत. या यादीत कर्नाटक, अंदमान आणि निकोबार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येक एका खासदाराचा समावेश आहे.

- Advertisement -

सरकारला प्रश्न विचारणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासाच मी सर्वात जास्त सक्रिय असते. – सुप्रिया सुळे; खासदार

डॉ. सुभाष भामरेने उपस्थित केले १६१ प्रश्न

सुप्रिया सुळे यांच्यानंतर डॉ. सुभाष भामरेने हे दुसऱ्या स्थानावर आहेत. भामरे यांनी या काळात लोकसभेत १६१ प्रश्न उपस्थित केले आहेत. यापैकी बहुतांश प्रश्न आरोग्य तसेच ग्रामीण समस्यांवरचे होते. भामरे हे पेशाने डॉक्टर असून ते महाराष्ट्रातील धुळे लोकसभा मतदारसंघात अंतर्भाव आहे. तसेच त्यांनी गावातील एक नाहीतर अनेक प्रश्न उपस्थित केले आणि ते आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

माझा उद्देश सरकारला जाब विचारण्याचा नसतो तर सरकारी योजनांची वस्तुस्थिती सभागृहापुढे यावी. संबंधित मंत्र्यांचे त्याकडे लक्ष वेधले जावे इतकाच प्रयत्न असतो. – डॉ. सुभाष भामरे; खासदार


हेही वाचा – ‘त्या’ दालनाकडे अखेर सर्वच मंत्र्यांनी फिरवली पाठ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -