घरमहाराष्ट्रविजयसिंह मोहिते पाटील मोदींच्या व्यासपीठावर

विजयसिंह मोहिते पाटील मोदींच्या व्यासपीठावर

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या पक्षावर नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता होती. मात्र या सभेमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. मात्र ते मोदींच्या सभेमध्ये व्यासपीठावर आल्याने पक्षाशी जोडले गेल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच विजयसिंह यांचे पूत्र रणजिंतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विजयसिंह देखील काही दिवसांमध्ये भाजपवासी होतील, अशी चर्चा होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सध्या पक्षावर नाराज असलेले विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र विजयसिंह मोहीते-पाटील यांनी अधिकृतपणे भाजपामध्ये जरी प्रवेश केला नसला तरी त्यांनी आज अकलूज येथील मोदींच्या सभेत हजेरी लावत लवकरच भाजपावासी झाल्याचे दाखवून दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार केला तसेच ‘मला विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करायला मिळाला. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो’, असे देखील मोदी यावेळी म्हणालेत. तसेच विजयसिंह यांनी ५० वर्ष राजकारणात घालवली आहेत. त्यांच्या कार्याचा आम्ही गौरव करतो असे म्हणत मोदींनी त्यांचे कौतुक केले.

- Advertisement -

दरम्यान नुकतीच अहमदनगरमध्ये काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मुलगा सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी मोदींनी सभा घेतली होती. त्यावेळी राधाकृष्ण विखे-पाटलांनी या सभेला मंचावर उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र विखेंनी हजर राहण्याचे टाळले होते. पण अकलूजच्या सभेत राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते – पाटील हे उघडपणे मोदींच्या सभेला उपस्थित राहिल्याचे पहायला मिळाले. तसेच काही दिवसांपूर्वीच विजयसिंह यांचे पूत्र रणजिंतसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे विजयसिंह देखील काही दिवसांमध्ये भाजपवासी होतील, अशी चर्चा होती. अखेर आज विजय सिंह मोहिते-पाटील यांनी आज व्यासपिठावर हजेरी लावत भाजपावासी झाल्याचे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रात आज पाचवी सभा झाली. शरद पवार यांनी माढा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. माढात यावेळी भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. तसेच बारामतीमधून कांचन राहूल कुल निवडणूक लढवत आहेत. हे दोन्ही उमेदवार यावेळी मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थितीत होते. पहिल्या चारही सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे आज ते शरद पवारांबद्दल काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -