शरद पवारांच्या वाढदिवसाचा निधी दुष्काळग्रस्तांना द्या – जयंत पाटील

Mumbai
sharad pawar birthday ncp workers help drought affected people
शरद पवार यांच्या वाढदिवशी कोणतेही कार्यक्रम न घेता तो निधी दुष्काळग्रस्तांना देणार

राज्यावर भयंकर दुष्काळाचे सावट असल्यामुळे लोकनेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी कुठलाही समारंभ करण्याऐवजी तो निधी किंवा मदत दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना दयावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. “आजपर्यंतच्या आपल्या प्रदीर्घ कार्यकाळामध्ये देशवासियांवर संकट आले असताना शरद पवार यांनी वाढदिवस साजरा केलेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही कार्यक्रम न घेता आपल्या भागातील लोकांना शक्य असेल ती मदत करावी” असेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

राम शिंदे यांचे वक्तव्य हीच सरकारची खरी मानसिकता – मुंडे

लोकसभेचे अधिवेशन सुरु असतानाही शरद पवार मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी याठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यावे, असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here