घरमहाराष्ट्रदुष्काळप्रश्नी शिष्ठमंडळाने घेतली जिल्हाअधिकाऱ्यांची भेट

दुष्काळप्रश्नी शिष्ठमंडळाने घेतली जिल्हाअधिकाऱ्यांची भेट

Subscribe

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना निवेदन दिले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंडेंनी पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरही टीका केली आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची आणि सामान्य जनतेची व्यथा मांडली. कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तर बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत मिळावी, चोवीस तासात टँकर मिळावे, पशुधनाला चारा आणि प्यायला पाणी मिळावा अशी मागणी करण्यात आली.

विहिरींचे काम अजूनही बाकी

प्रस्तावित दुष्काळी आराखड्यात मागणी असून एकाही विंधन विहिरीचे बांधकाम झालेले नाही. मनरेगाचे कोणतेच काम जिल्ह्यात सुरु नाहीत. मागेल त्याला सरकारने काम उपलब्ध करून घ्यावे. बीड जिल्ह्यात कॅनॉलच्या काठचा ऊस पाण्याअभावी वाळत आहे. शेतकऱ्यांच्या तलाव / विहिरींवरील कृषी पंपांची वीज जोडणी तोडली जात आहे त्यामुळे या सर्वांचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. हे कमी की काय तर महावितरणकडून वीज बिल भरले नाही म्हणून पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडले जात असल्याच्या तक्रारी व मागण्या त्यांनी केल्या.

- Advertisement -

मुंडेंनी केले आरोप

पीक विम्याचे पैसे प्रशासनाने बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा केले आहेत असे प्रशासन म्हणत आहे. मात्र, जिल्हा बँक कोणालाच पैसे वाटप करत नाहीये. हाच प्रकार बोंडअळी मदतीबाबत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक करत आहेत. हे कमी की काय पुरवठा विभागाने स्वस्त धान्याच्या दुकानातील पुरवठ्यात ७५ टक्के कपात केल्याची माहिती समोर येत आहे. मार्चच्या दरम्यान जेव्हा ऊस तोडणी कामगार पुन्हा परत येतील तेव्हा या मुद्द्यावरून मोठा संघर्ष निर्माण होऊ शकतो अशी भीती मुंडेंनी यावेळी व्यक्त केली.

नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून मुंडेंनी केली टोलेबाजी

आज काही कामांच्या भूमीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि पुण्यात आलेले होते. याचाच धागा पकडून धनंजय मुंडे म्हणाले की “आजवर ज्या कामांचे भूमिपूजन मोदी यांनी केले आहे त्यातले कोणतेही काम पूर्ण होणे तर सोडा साधे ते काम सुरु देखील झालेले नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक असो वा इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक असो त्या ठिकाणी अजून एक इंच खडीही टाकलेली नाही. थोडक्यात “जिस काम को मोदीजी हात लगाते हैं वो काम होता ही नहीं” असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला. भूमीपूजना ऐवजी त्यांनी राज्यातील दुष्काळ ग्रस्त भागाची पाहणी करायला हवी होती मात्र त्यांना शेतक-यांच्या दुःखाशी घेणेदेणे नाही असा टोला लगावला.
फसवे मुख्यमंत्री म्हणत फडणवीसांच्या कारभाराची केली पोलखोल मध्य प्रदेशात कमलनाथांनी केवळ काही तासांत कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रात किती जणांना कर्जमाफी मिळाले याची यादी मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत. तीन वर्षे अभ्यास करून येथे जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी होती. मुळात दोन व्यक्तींच्या ईच्छाशक्तीतील फरक म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -