घरताज्या घडामोडीपालघरमध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

पालघरमध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

Subscribe

पालघरमध्ये पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता पालघरमधील कोरोनाची संख्या २ वर गेली आहे.

पालघरच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयात दाखल असलेल्या ५० वर्षीय रुग्णाचा मंगळवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा पालघरमध्ये दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पालघरमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता २ वर गेली आहे.

पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी

पालघरमध्ये एका ५० वर्षीय रुग्णाचा मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. सफाळे जवळील उसरणी गावचा रहिवाशी असलेल्या मृत रुग्णाला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी दुपारी कस्तुरबा रुग्णालयातून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवण्यात येणार होते. पण, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. हा इसम काही दिवस सफाळे येथे आपल्या नातलगाकडे राहिला होता. त्यामुळे प्रशासनाने सफाळे परिसरात मनाई आदेश जारी करून लोकांची ये-जा बंद केली आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारपासून सर्व वाहनांना रस्त्यावर येण्यास बंदी घातली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! ‘त्या’ मेळाव्यातील १०६ जण पुणे विभागात; विभागीय आयुक्तांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -