घरमहाराष्ट्रभाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Subscribe

पार्थ पवार आणि जगताप यांची झाली योगायोगाने भेट.

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे अंतर्गत वाद सर्वश्रुत आहेत. बारणे यांना मावळ लोकसभेसाठी शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आहेत. आज पार्थ पवार हे प्रचार करत असताना पिंपळे गुरव येथे पोहचले तेव्हा भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांची योगायोगाने भेट झाली. त्यांच्यात १५ मिनिट चर्चा झाल्याने पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप यांची चर्चा रंगत आहे.

जगतापांचा पार्थ पवारांना पाठिंबा?

पार्थ अजित पवार आणि भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भेटीने शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच मावळचे विद्यमान खासदार आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे काही पटत नाही, त्यांचे अंतर्गत वाद सर्वश्रुत आहेत. याच आठवड्यात पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा शिवसेनेची (युतीची) बैठक पार पडली त्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट आणि शिवसेने च्या नेत्या नीलम गोऱ्हे या देखील बैठकीत उपस्थित होत्या.परंतु, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शवली.तसेच त्यांचे समर्थकांनी देखील दांडी मारली. बैठकीत बारणे विरोधात पत्रक वाटण्यात आल्याने खळबळ माजली होती. पार्थ अजित पवार आणि लक्ष्मण जगताप यांची भेट झाल्याने काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या मावळ लोकसभेत आमदार लक्ष्मण जगताप हे पार्थ पवार यांना पाठिंबा तर देणार नाहीत ना? यावर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात जगताप हे कोणाला पाठिंबा देतात हे कळेलच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -