राज्यात रब्बीची केवळ १७ टक्के पेरणी!!

पावसानं दडी मारल्यानं आता रब्बी पिकं देखील संकटात सापडली आहेत. राज्यात रब्बी पिकांची केवळ १८ टक्केच पेरणी झाली आहे.

Mumbai
Farmer of india

पावसानं ओढ दिल्यानं आता रब्बी पिकांच्या पेरणीवर देखील त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. आत्तापर्यंत राज्यात केवळ १७ टक्केच रब्बी पिकाची पेरणी झाली आहे. राज्यात रब्बी पिकांचे क्षेत्र साधारण ५६.९३ लाख हेक्टर आहे. आत्तापर्यंत यातील केवळ १३ टक्केच पेरणी झाली आहे. मागील ३ ते ४ दिवसामध्ये पेरणीच्या प्रमाणात केवळ ४ ते ५ टक्केच वाढ झाली आहे. राज्यात पावसानं ओढ दिल्यानं सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यात शासनानं आता दुष्काळ देखील जाहीर केला. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं यंदा खरीपावर देखील संक्रात आली. सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे त्याचा परिणाम हा सध्या रब्बी पिकांवर देखील होताना दिसत आहे. परिणामी, आता बळीराजासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here