घरमहाराष्ट्र'राज ठाकरे बदलले आहेत, त्यांना सोबत घ्या' - अजित पवार

‘राज ठाकरे बदलले आहेत, त्यांना सोबत घ्या’ – अजित पवार

Subscribe

राज ठाकरे यांनी महाआघाडीत यावला हवे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुर्वी शिवसेना आणि मनसेच्या विरोधात भूमिका घेताना दिसायचे. मात्र आता अजित पवारांचे ताजे वक्तव्य सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांनी आघाडीसोबत यावे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. “राज ठाकरे यांनी २०१४ साली नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. मात्र आज ते मोदींबद्दल काय बोलतात, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच मध्यंतरी त्यांनी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला देखील हजेरी लावली होती. राज ठाकरेंची भूमिका आता बदलली आहे, तसेच मनसेसोबत ठराविक मतांचा पाठिंबा नक्कीच आहे. त्यामुळे ते आघाडीत असतील तर फायदाच होईल”, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

Breaking – अजित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; दीड तास चर्चा रंगली

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी महाआघाडीबाबत आपले मत व्यक्त केले. स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांच्याबाबत काही मतभेद झाले असतील तर ते देखील दूर करण्यासाठी प्रयत्न करु, असेही अजित पवार म्हणाले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ४४ जागांवर एकमत झालेले आहे. त्यामुळे उरलेल्या चार जागा कुणाला द्यायच्या याबाबत आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही ते म्हणाले आहेत.

- Advertisement -
हे वाचा – राज ठाकरे महाआघाडीत असणार का? शरद पवारांनी केला खुलासा

“भाजप आणि शिवसेनेचा पराभव करायचा असेल तर सेक्युलर विचार करणाऱ्या सर्वांना एकत्र घ्यावे लागेल. त्या त्या वेळची राजकीय परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो. भारतातील सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी वेळोवेळी अशी राजकीय आघाडी केलेली आपण पाहिलेली आहे. या भूमिकेतून जर महाराष्ट्रात अनेकज एकत्र येत असतील तर त्यांना एकत्र घ्यावे लागेल.”, असे स्पष्ट मत पवारांनी या मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते मनसेबाबत मवाळ झाल्याचे अनेक प्रसंगातून दिसून आले आहे. त्यामुळे मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीत येणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र खुद्द शरद पवार यानींच मनसेला सोबत घेण्याचा कोणताही प्रस्तवा सध्या विचारात नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे अजित पवार यांनी जरी आपले वैयक्तिक मत मांडले असले तरी त्यातून महाआघाडीत मनसेला सोबत घेण्याचा एक विचारप्रवाह असल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा – ‘मेरा परिवार भ्रष्ट परिवार’ भाजपच्या टॅगलाईनवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -