घरमहाराष्ट्रअखेर 'त्या' वक्तव्यावरुन राजू शेट्टींनी मागितली माफी

अखेर ‘त्या’ वक्तव्यावरुन राजू शेट्टींनी मागितली माफी

Subscribe

'देशासाठी लढताना हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात. देशपांडे किंवा कुलकर्णींचे नाही', असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि आणि हातकणंगले येथील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अखेर माफी मागितली आहे. ‘देशासाठी देशपांडे, कुलकर्णींची मुलं शहीद होत नाहीत, शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात’, असं वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर ब्राम्हण समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. हेरले येथे आयोजित प्रचारसभेत लोकांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

‘ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी’

‘देशासाठी लढताना हल्ल्यात शेतकऱ्यांची मुलं शहीद होतात. देशपांडे किंवा कुलकर्णींचे नाही. पण ते इतरांना देशभक्ती शिकवतात’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन ब्राम्हण सामजातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. याशिवाय त्यांच्याविरोधात कोल्हापूरमध्ये पोलीस तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी अखेर माफी मागितली आहे. ‘ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल जाहीर माफी’, असे राजू शेट्टी म्हणाले आहेत. शहीदांना न्याय देण्याच्या हेतूने आपण हे वक्तव्य केल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -