घरमहाराष्ट्रगाढवा विरोधात तक्रार दाखल

गाढवा विरोधात तक्रार दाखल

Subscribe

हैदोस घालणाऱ्या गाढवाविरोधात रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. दोन महिलांचा चावा घेतल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण.

अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या दोन दिवसांपासून पिसाळलेल्या गाढवाने हैदोस घातला असून येथील शिक्षक कॉलनी परिसरातील दोन महिलांना चावा घेतल्याने नगरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे. अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या काही महिन्यापासून गाढव रस्त्याने सैरावैरा धावताना दररोज दिसतात. ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक यांची गैरसोय होत आहे. नागरिकांना गाढवापासून सुरक्षा मिळावी यासाठी रहिवाशांनी पालिकेकडे तक्रार दाखल केली आहे. या गाढवाने आतापर्यंत दोन महिलांचा चावा घेतला आहे. या गाढवाला बघून रहिवाशी भितीत आहे.

रहिवशांकडून गाढवाविरोधात तक्रार

महिलेच्या हाताचा चावा घेतल्यानंतर तेथील उपस्थित नागरिकांनी त्यांचा हात सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु गाढव महिलेचा हात सोडायला तयार नव्हते काही वेळानंतर चावा घेऊन हात सोडला आणि त्यानंतर शिक्षक कॉलनीतील काही तरुणांनी मोठ्या शिताफिने त्या गाढवाला बांधून ठेवले. आणि नगर पालिकेत तक्रार दिली. वृत्तलिहेस्तोवर पालिका कर्मच्याऱ्यांनी त्या पिसाळलेल्या गाढवाला ताब्यात घ्यायचे होते. शहरात गेल्या काही वर्षांपासून नर गाढवांची उपस्थिती जास्त असल्याने गाढव पिसाळण्याचे प्रमाण वाढत असल्याचे उपस्थित नागरिकांच्या चर्चेतून जाणवत होते.

- Advertisement -

या पूर्वीही माकडा विरोधात तक्रार

या पूर्वीही उत्तर प्रेदश राज्यात माकडा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. धर्मपाल सिंह ७० असे या व्यक्तीचे नाव होते. धर्मपाल घरातील पुजेसाठी लाकडे आणण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर माकडांनी हल्ला केला. माकडांनी धर्मपाल यांच्यावर विटा फेकून मारल्यामुळे धर्मपाल यांच्या डोक्याला आणि छातील मार लागला. या हल्ल्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे माकडांवर गुन्हा दाखल करुन घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -