घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या गांधीनगर दौऱ्याची मनसे, एनसीपीने उडवली खिल्ली!

उद्धव ठाकरेंच्या गांधीनगर दौऱ्याची मनसे, एनसीपीने उडवली खिल्ली!

Subscribe

भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील हजेरी लावली. मात्र विरोधकांनी त्यांच्यावर याकरता टिका केली आहे.

युतीमध्ये राहूनही एकमेकांची उणीधुणी काढणारे शिवसेना-भाजप अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकत्र आले. इतकेच नव्हे तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी गांधीनगर मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहिले. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवरून विरोधकांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शिवसेनेच्या अफजल खान वक्तव्याची आठवण करून दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ट्विट करून शिवसेनेतील वाघाच्या डरकाळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार 

गेल्या ५ वर्ष एकमेकांना ‘पटकणारे’, कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात! असले फितूर वाघ असूच शकत नाहीत. शिवसैनिक तर मुळीच नाही. शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

- Advertisement -

ठाकरेंने आधीच दिले उत्तर

भाजप अध्यक्ष अमित शहा आज, शनिवारी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी घटक पक्षातील प्रमुखे नेते यांना पाठिंबा दर्शवण्याकरता गांधीनगरमध्ये दाखल झाले होते. यावेळी महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात त्यांनी अपेक्षेप्रमाणे विरोधकांना टोला लगावला आहे. माझ्या गांधीनगरमध्ये येण्याने अनेकांच्या पोटात दुखलं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं. या पोटदुखीचा इलाज आमच्याकडे आहे, असेही ते म्हणाले. तसेच भाजप शिवसेनेत असलेल्या मतभेदाबाबतही त्यांनी भाष्य केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -