घरमहाराष्ट्रST प्रशासनाची धाकधूक वाढली; मुंबईतून परतलेले सांगलीतील १०६ कर्मचारी पॉझिटिव्ह

ST प्रशासनाची धाकधूक वाढली; मुंबईतून परतलेले सांगलीतील १०६ कर्मचारी पॉझिटिव्ह

Subscribe

मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सांगलीतून २०० चालक, २०० वाहक आणि इतर २५ असे एकूण ४२५ कर्मचारी मुंबईला गेले होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल १०६ एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी काही कामगार हे मुंबईला गेले होते. त्यानंतरच या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळतेय. सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची धाकधूक अधिकच वाढली आहे.

हे सर्व कर्मचारी मुंबईमध्ये सेवा देऊन सांगलीमध्ये परतले होते. मुंबईत बेस्ट बसची सेवा देण्यासाठी सांगलीतून २०० चालक, २०० वाहक आणि इतर २५ असे एकूण ४२५ कर्मचारी मुंबईला गेले होते. दहा दिवसांची सेवा दिल्यानंतर ते सांगलीत परतले. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी १०६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनासमोर नवं आव्हान उभं ठाकलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, बेस्टला मदत करण्यासाठी या सर्वांनी हजेरी लावली होती. यामध्ये ९ डेपोतील कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. कोरोनाची बाधा झालेल्या कामगारांमध्ये सांगली ६, मिरज ६, इस्लामपूर ६, विटा १४, आटपाडी १५, जत १५, कवठेमहांकाळ १४, तासगाव २४आणि शिराळा विभागातील ६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर कोव्हिड सेंटर, रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.


देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात; जुलैनंतर सर्वात कमी बाधितांची आज नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -