पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा स्फोट; ७ जणांचा मृत्यू तर ७० जखमी

पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर येत आहे. या स्फोटात ७ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पेशावरमधील दीर कॉलनीमध्ये ही घटना घडली असून लेडी रीडिंग रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्याात आली असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

पेशावरमध्ये झालेल्या स्फोटामध्ये १९ मुले जखमी झाल्याची माहिती असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी मुलांना लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा –

देशात कोरोनाचा कहर नियंत्रणात; जुलैनंतर सर्वात कमी बाधितांची आज नोंद