घरमहाराष्ट्रShravan Somvar: ...म्हणून श्रावणात शंकरास वाहिली जाते '​शिवामूठ'

Shravan Somvar: …म्हणून श्रावणात शंकरास वाहिली जाते ‘​शिवामूठ’

Subscribe

जाणून घ्या, ​शिवामूठ वाहण्याचे महत्त्व

लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.

शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत

प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामूठीचे महत्त्वही वेगळे आहे. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. पाचवा श्रावणी सोमवार आल्यास शिवामूठ म्हणून सातू वाहण्याची परंपरा आहे.

- Advertisement -

शिवामूठ: पहिला आठवडा – तांदूळ
शिवामूठ: पहिला आठवडा – तीळ
शिवामूठ: पहिला आठवडा – मूग
शिवामूठ: पहिला आठवडा – जवस
शिवामूठ: पहिला आठवडा – सातू

​शिवामूठ वाहण्याचे महत्त्व

प्रत्येक मुलीला वाटते की, आपण जेव्हा सासरी जातो, तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासुरवाशीण आपल्या सासरच्या माणसाची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा… माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. शक्यतो उष्टे खाऊ नये. सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी, असे सांगितले जाते.

- Advertisement -

शिवामूठ: दानाचे महत्त्व

दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न, हीच आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मूठभर असले तरीही ते देता आले, याचे गृहिणीना समाधान मिळते. मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले, याचे घेणाऱ्याला समाधान, असा दुहेरी लाभ या व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी, असे सांगितले जाते.


Shravan Somvar: जाणून घ्या, पहिल्या श्रावणी सोमवार व्रताविषयी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -